भारताचा माता म्हणून गौरव : याचे श्रेय सावित्रीमातेलाच!

0

 

‘बहुआयामी सावित्रीबाई फुले’ : भाग : ११

मुद्दा ७ : जगावे कसे? मोठा कर्मपाठ :

बालहत्या प्रतिबंधक गृह आश्रित मुला-मुलींचे संगोपन करून झाल्यावर सावित्रीबाईनी मुले-मुली शिक्षण घेऊन पुढे बाहेर पडल्यावर त्यांची अवस्था-

जीये तो जिये कैसे

बिन आपके

लगता नहीं दिल

कहीं बिन आपके

पुन्हा त्यांना कसे वाटेल त्या आज असत्या तर –

कैसे कहूँ बिना तेरे जिंदगी ये क्या होगी

ना प्यार ना ममता

ना जाणता ना समता

जैसे कोई सजा कोई बहुवा होगी.

काय मजा आहे सावित्रीबाईच्या गोतावळ्यात. ‘याद बहुत आये तेरा मुस्कुरा देना’ ‘महिला’ ची व्याख्या केली तर ‘मही’ म्हणजे ‘भूमी’ आणि ‘ला’ म्हणजे ‘लायक’, ‘ला’ प्रत्यय म्हटला तर ‘महिला’ हा पूर्ण शब्द आहे. भूमीला. आपल्या राष्ट्राची भूमी म्हणजे भारत. तीच राष्ट्रमाता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या राष्ट्राच्या मातेचा आत्यंतिक बहुमान म्हणून ‘भारत माता की जय’ गर्जन छाती फगवताना म्हणतात. कोणता असा देश आहे या पृथ्वीवर की ज्या देशाला ‘माता’ म्हणून संबोधले जाते? भारत राष्ट्राचा माता म्हणूनच गौरव झाला पाहिजे. याचे श्रेय सावित्रीमाता फुले यांना द्यावे लागेल. तर वर नमूद केल्याप्रमाणे या भारतीय स्त्रीला गुलाम म्हटले आणि निश्चित केले. आर्य आणि अनार्य युगात. आणि ‘स्त्रियांची गुलामी’ हा विषय आपल्या कार्याचा मानबिंदू निश्चित केला.

बंडाचा झेंडा या भारताच्या सर्वश्रेष्ठ महानगरात जेथे आर्यांचे मूळ स्थान आहे, त्या पुण्यात रोवला. स्त्री शिक्षणाची मशाल तेथे पेटवली. मशाल भडकवली. मशालीचा ‘शिक्षण जाहीरनामा’ जून १८४८ साली पहिली मुलींची शाळा काढली. पुण्याच्या भिडे वाड्‌यात जाहीरनामा लिहिला. शाळा सुरू केली पदर कमरेत खोचूनच. केवढे हे मनोधैर्य ? ४ ब्राह्मण मुली अशा अन्नपूर्णा जोशी, माधवी थत्ते, सुमती मोकाशी आणि जनी कर्डिले. एक मराठा दुर्गा देशमुख व एक धनगर सोनू पवार अशा एकूण ६ मुलींवर ही शाळेत किलबिल सुरू झाली. १५ मे रोजी दुसरी महिला शाळा काढली. मेजर कॅन्डी हे पुणे मुक्कामी होते. ३ जुलै १८५१, १७ नोव्हेंबर १८५१, १५ मार्च १८५३ या मुलींच्या तीन शाळा काढून शिक्षणाचा प्रसार व विस्ताराचा सपाटा सुरू केला. शाळांच्या विस्ताराचा डेटा मुंबई राज्याच्या लेखागारातील दस्तऐवजात सापडतो.

परीक्षा….

आता शाळा म्हटल्या आणि विद्यार्थी म्हटले की, परीक्षा आल्या.

सगळ्यांचे शाळा काढण्याचे प्रयत्न कसे फोल ठरवले?

एक वेळ अफाट पैसा मिळवलेला कोणीही बाहेर काढणार नाही. गुप्तताच पाळेल. तसेच त्याच्याही कोणाला चाव्या देऊ शकत नाही. त्याहीपेक्षा सत्ता ही अशी किमया आहे की, ती सोडावी वाटत नाही. ती सत्ता कोणत्याही क्षेत्रातली असली तरी तिची चावी ही एकदा काबीज केली, बळकावली की, काहीही करा ती दुसऱ्याच्या हाती सहजासहजी मिळणं मुश्किल आहे. त्यासाठी कोणत्या दिव्यातून जावं लागतं हे जाणणं तसं कठीणच. क्रांत्या झाल्या सत्तेत परिवर्तन आणण्यासाठी! कधी रक्तरंजित क्रांती, तर कधी वैचारिक क्रांती करावी लागते. व्यवस्थेतच बदलासाठीचा लढा द्यावा लागतो. समाजव्यवस्था, परंपरा, रुढी, वर्गवारी, जातवारी बदलत नसते काही केल्या?

वि. ना. चौधरी
वाघोड ता. रावेर
मो. ९५७९००६१५७
Leave A Reply

Your email address will not be published.