स्त्रियांची घुसमट करणारे तिला सतत गुलाम समजत होते!

0

 

‘बहुआयामी सावित्रीबाई फुले’ : भाग : १० 

आई-वडिलांचा मुलावरचा हक्क शाबूत असतो का? नाही. यामुळे आई-वडील कमालीचे दुःखी होतात. हे कोण पाहणार? वृक्ष आहे. वृक्षापासून गळून पडलेले पान, फुल जवळ घेता येत नाही. वृक्ष असमर्थ होतो. सागराकडे निघालेली नदी मागे ओढूनही तिचा बाप डोंगर तिला दिसत नाही. तसे नको असलेली ही स्त्री जी वाईट वेळ वाट्याला आली तर तिला कवटाळून बसत नाही. त्या वेळेला टाळून त्या मर्दानी स्त्रीने पुढे जावे. हा नियम आहे. जुनी दुःख सोडून द्यावी. ती आजची दुःख मानू नये. आणि भोगत बसू नये ही खरी बुद्धिमानी आहे. दिवस यशापयशाचा असतो. तो तेवढ्या वेळेपुरता संपवावा. कारण नव्या संधी, नव्या आशा ताजेपणा घेऊन पुढचा दिवस निसर्गात उगवलेला असेल. त्याला आपण सामोरे जाऊ शकलो पाहिजे. असे आपल्या मुलींच्या शाळेत आपल्या मुलींना शिकवण्यासाठी आपण आपले इष्ट कर्म म्हणून घरून जाताना रस्त्यात सावित्रीबाईना विरोधक चिखलफेक, दगडफेक करून अडवत होते. त्यांचा उपहास, उपमर्द करीत असले, तरी त्या घाबरत नसत. दुःखी होत नसत. हे खरे त्यांचे आनंदमय जीवन समुद्रातील दीपस्तंभासारखा मार्ग दावून जातो. बोध देऊन पुढे जात असतो.

हे निर्मिकाने दिले अशी त्याची देण्याची जाणीव श्रद्धा तर बळकट करतेच. शिवाय संतवचनातील मर्म आणि वर्म लक्षात घेऊन श्रद्धेने वाटचाल केली तर पारमार्थिक उन्नती घडवते. शिक्षण घेणे हा मुलींचा हक्क आहे. शिकण्याच्या वयात त्यांना शिक्षण देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्यावरील शिक्षण मिळू न देण्याचे गारुड महत् प्रयासाने हटवून त्यांना शिक्षण देऊन केवळ सज्ञान न बनवता शहाण्या करणे. याशिवाय पारमार्थिक काम कोणते असू शकते? हाच तर परमार्थाचा खरा अर्थ सावित्रीबाईनी जगाला सांगितला. त्यांना त्यांचे पतिश्री ज्योतिबा ‘माई’ म्हणत. माय सारखे स्नेहाळू, कृपाळू त्यांचे मन होते. हे ‘माई’ सार्थ नाव. नायगावच्या नेवसे पाटील या माहेरातही त्यांना माई म्हणू लागले होते. नवऱ्याने ‘माई’ हे आवडीचे नाव देणे ही साधी गोष्ट नव्हती. माहेरीही वडिलांकडे पाटीलकी होती. वजन होते या नावाला. अशा लौकिकदृष्ट्या भाग्यवान स्त्रीचे प्रपंच वाढत जातात. अनौरस मुली-मुले सांभाळली, वाढवली. त्यांना कोडकौतुकाने काळी माती लावून न्हाणलं धुतलं. टाळूला भरमसाठ तेल चोळलं, जिरवलं. सुखाचा प्रेमाचा अन्नाचा घास भरवला. कपडे चढवले. खूप खूप खेळवले. शिकवले पण पाठीत कधी रपाटा नाही मारला. फुलासारखे तेजात ठेवले. वाह रे वाह! वाढवून फुलवलेला गोड प्रपंच सावित्री माईंचा? झक्कास म्हणावे. प्रपंच अधोरेखित करणारी ही खरी द्रष्टी महान आई. तुमची आमची सर्वांचीच आहे. या आईचे कसले खाणेपिणे? खाण्यापिण्याचे नाही हो दुःख या महात्म्याला कधी. सुख हेच वर वर्णन केलेल्या परमार्थाचे.

स्त्रियांची घुसमट करणारे प्रकार त्यावेळी स्त्री गुलामी म्हणून होत असत. आज कोणी कोणाचे ऐकत नाही. या ऐरणीवरचा प्रश्न म्हणून घुसमट होत आहे. हे सत्य आहे कटू असले तरी? एक स्त्री तिच्यावर अनेक….

वि. ना. चौधरी
वाघोड ता. रावेर
मो. ९५७९००६१५७
Leave A Reply

Your email address will not be published.