Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»बहिणाबाई महोत्सवाची रोमांचक पोवाड्याने सांगता
    जळगाव

    बहिणाबाई महोत्सवाची रोमांचक पोवाड्याने सांगता

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 28, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भरारी फाउंडेशनतर्फे सागर पार्क मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी शाहीर सुमित धुमाळ यांच्या पोवाड्याने समारोप झाला. छत्रपती संभाजीनगरचे शाहीर सुमित धुमाळ व सहकारी यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा बहारदार अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर केला.

    महोत्वावत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीं संस्थांना बहिणाबाई विशेष सन्मानाने सन्मानीत करण्यात आले. महोत्सवात उपस्थित डॉ. अमोल पाटील, डॉ. धीरज चव्हाण, विक्की राजपूत, डॉ. मंदार पंडीत, सिताराम महाजन, किरण सैंदाणे आदी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.

    बहिणाबाई महोत्सवाची शुक्रवारी सायंकाळी अभिनेत्री श्रेया बुबडे व अभिनेते कुशल बद्रीके यांचा हास्य प्रहासानाने सुरुवात झाली होती. शनिवारी सायंकाळी मराठी संस्कृती जपणारा महिलांचा फॅशन शो पार पडला. यात मराठमोळ्या पोषाखात तरुणींनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. तर रविवारी सायंकाळी शाहीर मीरा दळवी व सहकारी यांचा लावणी महाराष्ट्राची तसेच प्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे यांचा भारत गौरव पर्व हे कार्यक्रम उत्साहात पार पडले. अखेर सोमवारी रोमांचक पोवाड्याने महोत्सवाचा समारोप झाला.

    यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, अपर कोषागार अधिकारी कैलास सोनार, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे जिल्हा दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र मोरखेडे, बाळासाहेब सुर्यवंशी आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विनोद ढगे, सचिन महाजन, मोहित पाटील, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, सागर पगारीया, दिपक जोशी, मंगेश पाटील अभिषेक बोरसे, आकाश भावसार, भूषण खंबायत, यांनी परिश्रम घेतले सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी केले.

     

    अडीच कोटीहून अधिकची उलाढाल

    या पाच आदिवासीय महोत्सवात विविध बचत गटांनी आपले स्टॉल लावले होते. त्यांच्या मालाच्या विक्रीतून २ कोटी ६० लाखांची उलाढाल झाल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी बोलतांना दिली. महोत्सवात बचत गटांनी विक्रीस ठेवलेले खाद्य पदार्थ, दैनंदिन गृहोपयोगी वस्तू, तसेच चैनीच्या वस्तूंना ग्राहकांची विक्रमी दाद मिळाली. यातून यंदा अडीच कोटीपेक्षा जास्तची आर्थिक उलाढाल या उपक्यारम्ठित झाली. काणी सुक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने उद्योगांना चालना देण्यासाठी विविध उत्पादनांचे स्टॉल तसेच खानदेश पर्यटनाचे दालन तसेच ॲक्युपंचर शिबीर विशेष आकर्षण ठरले.

    2025 Bahinabai Mahotsavav Bahinabai Special Honour Bharari Foundation Concluding Powada Safat Group Sagar Park Maidan Shahir Sumit Dhumal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif