जळगावात बहिणाबाई महोत्सवाचे थाटात उद्घाटन

पाच दिवस विविध कार्यक्रम : जळगावकरांना सांस्कृतिक मेजवाणी

0

जळगाव : भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडाई यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या बहिणाबाई महोत्सवास शुक्रवारी सुरवात झाली. याठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पद्धतीने चैत्राम पवार यांनी उत्सवाचे उद्घाटन केले. या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, सत्यनारायण बाबा मौर्य यांचा भारत माता की आरती, ह. भ. प रविकिरण महाराज यांचे किर्तन, देशभक्तीपर गीते, वहीगायन, भावगीते, मराठी संस्कृतीचा फॅशन शो, लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहेत. खाद्यपदार्थ आणि विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स याठिकाणी असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खेळ पैठणीचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धा झाली. चैत्राम पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. खासदार स्मिता वाघ यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या 11 व्या पर्वाला शुभेच्छा दिल्या. आमदार राजूमामा भोळे, उद्योगपती रजनीकांत कोठारी, माजी आमदार मनिष जैन, अनिकेत पाटील, अनिश शहा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा संगीता पाटील, दीपक सराफ, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, श्रीराम पाटील, डॉ . पी. आर. चौधरी, शैलेश मोरखडे, नगरसेवक दीपक सुर्यवंशी, जयश्री राहुल पाटील, माधुरी बारी, सागर पगारीया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, पवन जैन, सागर परदेशी यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले. विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली. यावेळी स्थानिक कलाकारांना कलांचे सादरीकरण केले.

आजपासून विविध पुरस्कारांचे वितरण
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीं व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. उद्योग व शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुखराज पगारीया व निळकंठ गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने तसेच प्राचार्य मानसी गगडाणी यांनी शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.