Saturday, January 28, 2023

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती उत्साहात साजरी…

- Advertisement -

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

सूक्ष्म निरीक्षण शक्ती, अचंबित करणारी प्रतिभा, जीवनाकडे बघण्याची सकारत्मक दृष्टी, सुलभ सोप्या लेवा गणबोली भाषेतून जीवनाचे सार कवितेतून मांडण्याची अचाट बुद्धिमत्ता आणि चालतं बोलतं विद्यापीठ असणाऱ्या खान्देशभुषण कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणजे कवितांमधून जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या महान कवयित्री.

- Advertisement -

मा. महापौर सिमा भोळे आणि प्रथम महापौर तसेच बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशा कोल्हे, अ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप (बंडु) भोळे, बहिणाई ब्रिगेडच्या उपप्रदेशाध्यक्ष हर्षा बोरोले, नगरसेवक विरेन खडके,  बहिणाबाई ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सौ सुनिता येवले, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे, महानगराध्यक्ष योगेश काळे यांनी पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी लेवा गणबोली मंडळाचे सचिव व कलावंत तुषार वाघुळदे यांनी कायक्रमाचे प्रास्ताविक केले. तर, बंडु भोळे व सौ. सुनिता येवले यांनी मनोगत व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यिक कार्याला उजाळा देण्यात आला. आमदार सुरेश भोळे यांनी १० – १२ दिवसात महापालीकेच्या उद्यानातील पुतळ्याचे सुशोभिकरण, पुतळ्यावर आकर्षक छत्र, मार्बल व ग्रॅनाईटचा चौथारा, स्टीलचे रेलींग व पायऱ्या तसेच नेमप्लेट इ. चे काम स्वखर्चाने  करून दिल्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले. आमदार सुरेश भोळे (राजूमामा) हे अधिवेशना निमित्त मुंबई येथे असल्याने सिमा भोळे व विरेन खडके यांच्या मार्गदशनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. त्यानिमित्ताने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सिमा भोळे व विरेन खडके यांचा सत्कारही करण्यात आला. बहिणाई ब्रिगेडच्या महानगराध्यक्षा साधना लोखडें यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी प्रदेशसदसय निखिल रडे, महानगर कार्याध्यक्ष सागर महाजन, योगेश काळे, सुरेश फालक, धिरज पाटील, गणेश काळे व बहिणाई ब्रिगेडच्या पुष्पा पाटील, कांचन आटाळे तसेच युवक महासंघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे