लक्ष द्या.. बडनेरा- नाशिक मेमूचे नवीन वेळापत्रक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.. उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाडी क्र. ०१२११ बडनेरा ते नाशिक विशेष मेमू गाडीच्या वेळेत बदल झाला आहे.

रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढचा निर्णय घेतलाय. गाडी क्र. ०१२११ बडनेरा ते नाशिक तसेच गाडी क्र. ०१२१२ नाशिक ते बडनेरा या गाड्यांना ३० पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

नवीन वेळापत्रक
बडनेरा (सकाळी १०.०५ वाजता), मूर्तिजापूर (सकाळी १०.३० वाजता), बोरगाव सकाळी १०.४८ वाजता, अकोला सकाळी ११.०२ वाजता, शेगाव सकाळी ११.३३ वाजता, नांदुरा (दुपारी १२.०३ वाजता), मलकापूर (दुपारी १२.३८ वाजता), बोदवड (दुपारी १.३७वाजता), भुसावळ (दुपारी ३.० > वाजता), जळगाव (दुपारी ३.३५ वाजता), पाचोरा (दुपारी ४.०५ वाजता), चाळीसगाव (दुपारी ४.३८ वाजता), नांदगाव (दुपारी ५.२० वाजता), मनमाड (दुपारी ५.५० वाजता), लासलगाव (संध्याकाळी ६.०५ वाजता), निफाड (६.२५ वाजता), नाशिक (रात्री ७.५ वा.)

Leave A Reply

Your email address will not be published.