Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»संपादकीय»बच्चू कडूंचा ‘शिवसेनेत प्रवेश’ आमदारकीसाठीची तडजोड!
    संपादकीय

    बच्चू कडूंचा ‘शिवसेनेत प्रवेश’ आमदारकीसाठीची तडजोड!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 3, 2026No Comments247 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    प्रहार संघटनेचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार संघटनेला शिवसेनेत विलीन करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी विधान परिषदेची आमदारकी मिळवली. दोन जागा त्या शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्या. त्यापैकी एक जागा नीलम गोऱ्हे आणि एक जागा बच्चू कडू यांना देण्यात आली आहे. विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. विरोधी उमेदवार एकही नसल्याने विधान परिषदेच्या जागा बिनविरोध निवडून गेल्या आहेत. भाजप 5, बच्चू कडू 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1, शिवसेना उबाठा 1 अशा जागा आहेत. आता प्रश्न येतो की प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु 2024 च्या निवडणुकीत त्यांचा आमदारकीत पराभव झाला आणि गेले दीड वर्ष ते आमदारकी शिवाय होते. या दीड वर्षात बच्चू कडू यांनी आमदार नसताना बरीच आंदोलने केली. शेतकरी कर्जमाफीसाठी त्यांनी फार मोठे आंदोलन छेडले होते. मोर्चा काढून सरकारच्या नाकी नऊ आणले होते. विधानसभा अधिवेशनात त्यांच्या आंदोलनाची शासनाने दखल घेतली आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन सरकारकडून करून घेतले गेले. असे छोटे मोठे आंदोलन बच्चू कडू हे सातत्याने करीत राहायचे. शेतकरी, शेतमजूर, वंचित आणि दिव्यांगांसाठी झटणारा नेता शेवटी सत्ताधारी शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होऊन धनुष्यबळ हाती घेतले आहे आणि आपली प्रहार संघटना ही शिवसेनेत विलीन केली आहे. प्रहार संघटना जरी शिवसेनेत विलीन झाली असली तरी माझे मुद्दे जे आहेत, ते शेतकरी, शेतमजूर, वंचित आणि दिव्यांग यांचे बाबतीत मी तडजोड करणार नाही. हे मुद्दे कायम ठेवून मी शिवसेनेत कायम राहणार काम करणार आहे. असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. परंतु बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांच्यावर फार मोठी टीका होते आहे. केवळ आमदारकीसाठी बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदारकी शिवाय बच्चू कडू राहू शकत नाहीत अशी टीका त्यांच्यावर होते आहे. त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची काय गरज होती? ते विरोधी पक्षात राहून चांगल्या प्रकारे समाजसेवा करू शकतात. विरोधी पक्ष म्हणून आपली ताकद काय आहे हे दाखवून देऊ शकतात. पण बच्चू कडू यांनी शेवटी आपली प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करून स्वतः शिवसेनेत प्रवेश केला आहे. टीका करणाऱ्यांना बच्चू कडूंनी सुनावले आहे, की मी काय करायचे काय करू नये हे सांगणारे कोण? असा सवाल केला आहे. शिवसेनेत राहून मी शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. एकीकडे बच्चू कडू म्हणतात की शिवसेनेत प्रवेश हा राजकारण करण्यासाठी झाला आहे. परंतु समाजकारण करण्यासाठी मी माझ्या प्रहार संघटनेचा उपयोग करणार आहे. हे त्यांचे विरोधी स्टेटमेंट कमालीचे विरोधाभास दर्शवणारे आहे. त्यांना पत्रकारांनी विचारले की मंत्रीपदासाठी तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे म्हणतात त्यावर बच्चू कडू म्हणाले, काय मंत्रीपद मागण्याची काही गरज नाही. मंत्रिपद मागायचेच होते तर मी गुवाहाटीला जेव्हा गेलो होतो तेव्हा मागितले असते. परंतु मंत्रिपदाऐवजी मी माझ्या दिव्यांगांसाठी नवीन मंत्र्यांचे खाते करावे, ही मागणी केली. ती एकनाथ शिंदे यांनी मान्य केली. त्यामुळे मला मंत्रीपदाची काही आवश्यकता नाही. त्यामुळे कोणी आरोप करीत असेल की मंत्रीपदासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर असे म्हणणे चुकीचे आहे.

    बच्चू कडू कितीही म्हणत असले की मी आमदारकी आणि मंत्री पदासाठी शिवसेनेत प्रवेश केला नाही, तरी यांचा हा दावा खोटा आहे. त्यांचा हा प्रवेश आमदारकीसाठी आणि त्यानंतर मंत्रिपद यासाठीच आहे, हे तितकेच खरे आहे. उगीच ताकाला जायचे आणि लोटा लपवायचा अशातला प्रकार करण्यात काही अर्थ नाही. एवढा मोठा प्रहार पक्ष विलीन करण्याचा त्याग बच्चू कडू करतील असे वाटत नाही. त्यामागे त्यांचा स्वार्थ स्पष्ट दिसून येतो आहे. आता बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मोठमोठ्या गोष्टी करायला लागले आहेत. शिवसेना संघटना वाढवा येण्यासाठी मी रक्ताचे पाणी करणार आहे. त्याचबरोबर ते म्हणतात की शिवसेना संघटनेची ताकद पूर्ण महाराष्ट्रात दिसून येईल. त्याचबरोबर शिवसेना संघटना वाढली की एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. त्यांना मी मुख्यमंत्री बनवणारच, अशा शब्दात त्यांनी आपल्या मोठ्या गप्पा मारल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तारीफ करायची काही एक कसर त्यांनी सोडली नाही. परंतु त्याचबरोबर भाजप या महायुतीतील पक्षावर जोरदार टीका देखील केली आहे. भाजपकडे लोकांचा वाढता कल आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेली ईव्हीएम मशीन हे होय. ईव्हीएम मशीनद्वारे आपण निवडणुका घेतो हा प्रत्येकाचा समज असल्यामुळे भाजपकडे लोकांचा कल आहे. सत्ताधारी शिवसेना पक्षात राहून भाजपवर टीका करतोय याचे भान बच्चू कडूंनी ठेवले पाहिजे. भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून त्यांना डावलून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, असे बच्चू कडूंचे म्हणणे हे फडणवीस यांना कितपत रुतेल? हे सांगता येत नाही. त्यामुळे पाण्यात राहून माशाशी वैर करणे हे कितपत योग्य आहे? याचे बच्चू कडूंनी भान राखले पाहिजे. आधीच बच्चू कडू हे विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात होते आणि भाजपच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे बच्चू कडू हे भाजपचा द्वेष करणारे आहेत. हे भाजपला चांगलेच माहित आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ताबडतोब जी वक्तव्य बच्चू कडू करत आहेत. ते त्यातून शिवसेनेला मारक ठरत आहेत. एक बच्चू कडूंमुळे राजकीय भूकंपाची दाट शक्यता आहे. पाहूया काय होते ते.. घोडा मैदान जवळच आहे..!

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!

    September 6, 2026

    अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!

    September 3, 2026

    महामार्ग कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif