नाशिकचे नुतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यभार स्विकारला
नाशिक प्रतिनिधी नाशिकचे नुतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज कार्यभार स्विकारला. अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. आगामी कुंभमेळ्याच्या कामांना गती देण्याबरोबरच नाशिकचे ब्रॅंडीग करण्यावर आपला भर राहील असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
प्रसाद हे अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१५ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी धाराशिव येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी, घोडेगाव येथे आदिवासी विकास विभाागाचे प्रकल्प अधिकारी, अकोला आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.