आयआयएम इंदूरच्या १२ विद्यार्थ्याना मिळाले एक कोटींपेक्षा अधिक पॅकेज !

0

 

इंदौर , लोकशाही न्यूज नेटवर्क
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-इंदूरच्या एका विद्यार्थ्याला नोकरीसाठी ₹1.14 कोटींचे वार्षिक वेतन पॅकेज ऑफर करण्यात आले आहे,
कंपन्यांची निवड प्रक्रिया त्यांच्या नियमांप्रमाणे वेगवेगळी असते त्यामुळे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे नोकरीसाठी निवड केली जाते. आयआयएम इंदूरमध्येही नुकतीच कॅम्पस प्लेसमेंट झाली.

इंदूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधल्या 12 विद्यार्थ्यांना नोकरीसाठी 1.14 कोटी रुपयांचं वार्षिक सॅलरी पॅकेज ऑफर करण्यात आलं आहे. आयआयएम-इंदूरच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या सेशनच्या फायनल प्लेसमेंटदरम्यान ऑफर केलेलं हे सर्वाधिक सॅलरी पॅकेज आहे. यात मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 132.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.