भारतात रिलीज होण्याआधीच ‘अवतार 2’ लीक !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जेम्स कॅमेरॉन यांनी दिग्दर्शित (Director James Cameron) केलेला ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची चाहते वाट पाहत होते. हा सिनेमा भारतात आज प्रदर्शित झाला. मात्र हा सिनेमा भारतात प्रदर्शित होण्याआधीच गुरुवारी 15 डिसेंबर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टोरेंट साइटवर लीक झाल्याची माहिती मिळाली आहे. सर्वाधिक खर्चिक चित्रपट असल्याने याला मोठा झटका बसला आहे.

सुपरहिट ‘अवतार’ (Avtar 2)या सिनेमाचा हा सिक्वल असून 13 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट लीक झाल्याची माहिती काही वेबसाईट्सनी दिली आहे. हा चित्रपट आता टॉरेंट साइट्स आणि इतर पायरसी नेटवर्कवर 600MB ते 4GB पर्यंतच्या साईजमध्ये उपलब्ध होत असल्याचं आढळलं आहे. मात्र एक दिलासादायक बाब म्हणजे लीक झालेल्या कॉपीची कॅमेरा क्वालिटी अत्यंत खराब आहे.

काय आहे ‘अवतार 2’ ची कथा

‘अवतार’ हा सिनेमा 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या अॅनिमेशन सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली. तेव्हापासून या सिनेमाच्या सिक्वेलची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. मागच्या भागात पँडोरामध्ये मानवाला मौल्यवान खजिना मिळाला होता. या भागातील कथानक 10 वर्षे पुढे सरकले आहे. पृथ्वी मानवाच्या राहण्यायोग्य नसल्यानं नवीन ग्रहाचा शोध सुरू आहे. पँडोरामध्ये नावी समुदायातील जॅक सली आणि त्याची प्रेमिका नेतिरी चार मुलांसोबत आनंदानं रहात आहेत. यात दोन मुले, एक सख्खी मुलगी, एक दत्तक मुलगी आणि माणसाचा मुलगा स्पायडरही आहे. त्यांच्या सुखी कुटुंबाला कोणाची तरी नजर लागते. पँडोरातील लोकांना स्काय पीपल म्हणणारे पृथ्वीवरील लोक मृत कर्नल माईल्सच्या आठवणी व डीएनएतून अवतरलेल्या कर्नल क्वारिचला सलीचा सूड घेण्याच्या मोहिमेवर पाठवतात. सलीच्या मुलांवर हल्ला करून तो स्पायडरला ओलीस ठेवतो. त्यानंतर सली काय करतो ते पुढे पहायला मिळतं.

Leave A Reply

Your email address will not be published.