युवासेना विभागीय सचिव आविष्कार भुसे दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात युवासेनेचे विभागीय सचिव आविष्कार भुसे ५ व ६ एप्रिल २०२२ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे. या दोन दिवसात रावेर व जळगाव लोकसभेतील विविध तालुक्यात विधानसभा निहाय बैठक घेणार आहेत.

मंगळवार दिनांक ०५ एप्रिल २०२२ रोजी भुसावळ, जामनेर व मुक्ताईनगर विधानसभेची बैठक शासकीय विश्रामगृह मुक्ताईनगर येथे सकाळी ११ वाजता तसेच रावेर व चोपडा लोकसभेची बैठक दुपारी ३ वाजता चोपडा येथे आयोजित करण्यात आली आहे.

बुधवार दिनांक ६ एप्रिल २०२२ रोजी जळगाव ग्रामीण व जळगाव शहराची बैठक सकाळी १० वाजता पाळधी येथे दुपारी १ वाजता पाचोरा येथे पाचोरा, भडगाव व चाळीसगाव विधानसभेची बैठक या नंतर सायंकाळी ४ वाजता पारोळा येथे एरंडोल पारोळा व अमळनेर तालुकच्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या दौऱ्यात युवासेना विभागीय सचिव आविष्कार भुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया, युवासेना जळगाव लोकसभेचे जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, रावेर लोकसभेचे युवासेना जिल्हा युवाधिकारी चंद्रकांत शर्मा, जिल्हा युवाधिकारी पंकज राणे उपस्थित राहणार आहे.

या दौऱ्यात युवासेना पदाधिकारी यांना सिनेट निवडणूक विषयी मार्गदर्शन, युवासेना सदस्य नोंदणी अभियाना सविस्तर माहिती तसेच युवासेनेच्या तालुका निहाय कार्याचा आढावा विभागीय सचिव आविष्कार भुसे यांच्या कडून घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त युवासैनिकांनी उपस्थितीत राहावे असे आव्हान युवासेना जिल्हा युवाधिकारी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.