‘सावली’चे संस्थापक किशोर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन : जागेसाठी रेडक्रॉसचे नागरिकांना आवाहन जळगाव : दीर्घकाळ आजारपणामुळे परावलंबी झालेल्या रुग्णांची काळजी घेणे अनेक कुटुंबांसाठी मोठे आव्हान ठरते. अशा रुग्णांना सुरक्षित निवारा, वैद्यकीय शुश्रूषा, पोषण, स्वच्छता आणि मानसिक आधार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगावमध्ये ‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर’ उभारण्याचा पुढाकार इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखेने घेतला आहे, अशी माहिती सावली केअर सेंटरचे संस्थापक किशोर देशपांडे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी मंगला ठोंबरे, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, गनी मेमन, धनंजय जकातदार, राजेश यावलकर, सुभाष साखला उपस्थित होते. या केंद्राच्या उभारणीसाठी योग्य बंगला किंवा इमारत उपलब्ध करून देण्याचे आवाहन रेडक्रॉसच्या वतीने करण्यात आले असून, प्रकल्पासाठी प्रारंभी…
Author: rajelok11@gmail.com
सहकार विभागाच्या अहवालानंतर पोलिसांची कारवाई एरंडोल – तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारप्रकरणी तिघांविरुद्ध एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय रामदास महाजन, रामदास गजमल महाजन आणि सुनील रामदास महाजन अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 च्या कलम 39 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगीता चंद्रकांत साळुंखे (वय 53, व्यवसाय नोकरी, सहकार अधिकारी श्रेणी-1 तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, एरंडोल) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. आरोपी संजय रामदास महाजन, रामदास गजमल महाजन आणि सुनील रामदास महाजन हे तळई, ता. एरंडोल येथील रहिवासी असल्याचे नोंदीत नमूद आहे. त्यापैकी रामदास गजमल…
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव – कोरोना महामारी आणि चिकुनगुनियासारख्या साथींच्या संकटांचा आपण सर्वांनी मिळून यशस्वी सामना केला. त्यावेळी प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकजुटीने काम केले. त्याच अनुभवाच्या बळावर योग्य नियोजन, पूर्वतयारी आणि समन्वयातून दुष्काळी परिस्थितीवरही निश्चित मात करता येईल. मात्र त्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारी ओळखून मिशन मोडवर काम करणे आवश्यक आहे. अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. कर्तव्यात हलगर्जीपणा किंवा विनापरवानगी गैरहजेरी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. पारोळा तहसील कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व या मतदारसंघाचे…
एकनाथराव खडसेंच्या तक्रारीनंतर पोलिसांची सखोल चौकशी विमानतळ प्रशासनाच्या पडताळणीत प्राथमिक निष्कर्ष स्पष्ट जळगाव : मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी केल्याच्या तक्रारीची जळगाव जिल्हा पोलिसांकडून सविस्तर चौकशी करण्यात आली. या प्रकरणात संबंधित दृश्यांची पडताळणी, विमानतळ प्रशासनाकडून प्राप्त माहिती आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या प्राथमिक तपासणीत संबंधित दृश्ये ड्रोनची नसून जळगाव विमानतळावरून उड्डाण केलेल्या प्रशिक्षण विमानाची असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी केल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित परिसरातील माहिती संकलित…
आठवणीतील ‘नाना’! नाना-मकरंदला जळगावला येण्याची वेळच येऊ नये! आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देताना नाना पाटेकरांचा भावनिक सवाल : 352 कुटुंबांना प्रत्येकी 15 हजारांची मदत जळगाव : शेतकऱ्याच्या घरातील कर्ता पुरुष निघून गेल्यानंतर मागे उरलेल्या कुटुंबाची अवस्था केवळ आर्थिक मदतीने बदलत नाही; त्यांना माणुसकीचा आधारही हवा असतो. हाच आधार देण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे जळगावात आले आणि त्यांच्या उपस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या डोळ्यांत आशेचा किरण दिसला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात ‘नाम फाउंडेशन’तर्फे आयोजित कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील 242 आणि धुळे जिल्ह्यातील 110 अशा 352 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 15 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. नाना पाटेकर आणि मकरंद…
आठवणीतील ‘नाना’! नाना पाटेकर यांची जळगावला भेट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिला आधार जळगाव : अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली. या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील 242, तर धुळे जिल्ह्यातील 110 अशा एकूण 352 कुटुंबांना प्रत्येकी 15 हजार रुपयांची मदत देण्यात आली होती. शेतकरी कुटुंबांवर आलेले संकट केवळ आर्थिक नसून त्याचा…
सोने 1442 तर चांदी 1030 रुपयांनी कोसळली! जळगाव : येथील सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच शनिवारी सोन्याच्या दरात 1,442 रुपयांची, तर चांदीच्या दरात 1,030 रुपयांची घट झाली. दर कमी झाल्याने दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगावच्या सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात 515 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर तीन टक्के जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 1,53,985 रुपये इतका झाला होता. मात्र, शनिवारी बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1,442 रुपयांची घट नोंदवण्यात…
राज्य शासनाचा मोठा निर्णय : रुग्णांची गैरसोय टळणार मुंबई : महाराष्ट्रात वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णवाहिका मिळवणे आता कॅब बुक करण्याइतके सोपे होणार आहे. राज्य परिवहन आणि आरोग्य विभागाकडून एका नाविन्यपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम सुरू असून, याद्वारे नागरिक मोबाईल ॲप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून आपल्या सर्वात जवळ उपलब्ध असलेली रुग्णवाहिका सहज शोधू आणि बुक करू शकतील. थेट स्थान आणि माहिती: या प्रस्तावित प्लॅटफॉर्मवर रुग्णवाहिकेचे लाईव्ह लोकेशन (थेट स्थान), पोहोचण्याची अंदाजित वेळ आणि प्रवासाचे सेवा शुल्क स्पष्टपणे दाखवले जाईल. आरोग्य आणि परिवहन विभागाचा संयुक्त उपक्रम: विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये नोंदणीकृत असणाऱ्या सर्व रुग्णवाहिकांचे तपशील या प्रणालीशी जोडले जातील. खाजगी चालकांचा सहभाग: खाजगी रुग्णवाहिका…
एसटीचा प्रवास अधिक सुलभ : प्रवाशांसाठी नवी पर्वणी मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेतील पास आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आगारात जाऊन हस्तलिखित पद्धतीने पास काढण्याची आवश्यकता राहणार नसून, घरबसल्या ऑनलाइन पास मिळवता येणार आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या 4 व 7 दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन पास काढताना प्रवाशांना आवश्यक माहिती भरल्यानंतर नियमानुसार पास उपलब्ध होणार…
माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार : ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ मुंबई : शहरे, लहान गावे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा ऑनलाइन वावर वाढत असताना त्यांना सायबर गुन्ह्यांच्या नवनवीन प्रकारांचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे डिजिटल जनजागृती आणि डिजिटल स्वच्छता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची असून, भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती हीच प्रभावी ‘फायरवॉल’ ठरू शकते, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (डीएससीआय) सायबर सुरक्षा जनजागृती अंतर्गत देशव्यापी ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये (बीएसई) झाला. महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेत नागरिकांना दैनंदिन…
24 विभागात 240 हॉटस्पॉटवर महानगरपालिकेची करडी नजर मुंबई : मुंबई शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत 10 वायु प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करण्यात येणार आहेत. बांधकामे व पुनर्विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा कामे, कचरा जाळण्याची ठिकाणे, राडारोडा टाकण्याची ठिकाणे व वाहतूक कोंडीची ठिकाणे यांचा हॉटस्पॉटमध्ये समावेश करण्यात येणार आहे. मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती आराखडा – 2026 तयार झाला असून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांनी प्रशासनाला दिले आहेत. या कृती आराखड्यानुसार प्रत्येक विभागात…
लोकशाही न्यूज नेटवर्क – कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता सायबर गुन्ह्यांसाठीही मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे समोर आले आहे. ‘EvilTokens’ नावाच्या सबस्क्रिप्शन आधारित एआय चॅटबॉटने जगभरातील जवळपास १२ हजार मायक्रोसॉफ्ट अकाऊंटमध्ये घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराची दखल घेत मायक्रोसॉफ्टने संबंधित चॅटबॉटचे ऑपरेशन बंद करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. ‘EvilTokens’ हे प्लॅटफॉर्म फेब्रुवारी महिन्यात टेलिग्रामवर प्रथम सक्रिय झाले होते. सुरुवातीला त्यासाठी १,५०० डॉलर शुल्क आकारले जात होते. त्यानंतर मासिक ५०० डॉलर शुल्क निश्चित करण्यात आले. ई-मेल अकाऊंटमध्ये घुसखोरी करण्यासाठी आवश्यक सेवा या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे मायक्रोसॉफ्टच्या तपासणीत आढळले. ई-मेलमध्ये घुसखोरी करून आर्थिक व्यवहारांवर…
लोकशाही न्यूज नेटवर्क – जळगाव : मान्सूनने आता परतीचा प्रवास सुरू केला असून, १५ ऑक्टोबरपर्यंत तो राज्यभरातून पूर्णपणे माघारी फिरण्याची शक्यता आहे. मात्र, परतीच्या प्रवासात मान्सून जळगाव जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावण्याच्या तयारीत आहे. हवामान विभागाने २४ आणि २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेष म्हणजे, २५ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन असल्याने या दिवशी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. मागील अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. त्यातच तापमानात वाढ झाल्याने उकाडाही प्रचंड वाढला होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. बुधवारी अनेक दिवसांच्या खंडानंतर जळगाव शहरात सुमारे १५ ते २० मिनिटे…
लोकशाही न्यूज नेटवर्क – जळगाव : ‘पुढे पोलिस अधिकारी उभे आहेत. अंगावर सोने-चांदीचे दागिने असल्यास ११ हजार रुपयांचा दंड होईल. त्यामुळे दागिने काढून ठेवा,’ असे सांगत दोन भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून ७८ वर्षीय व्यावसायिकाला गंडविल्याची घटना मंगळवारी (२२ सप्टेंबर) जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीजवळ घडली. भामट्यांनी वृद्धाकडील सोन्या-चांदीचे दागिने कागदाच्या पुडीत ठेवण्यास सांगून ते हातोहात लंपास केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज कुंदलमल जैन (७८, रा. गुजराथी गल्ली) हे इलेक्ट्रिकल वस्तूंचे व्यावसायिक असून, मंगळवारी पत्र्या हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर टॉवर चौकाच्या दिशेने जात होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडविले. ‘मोठ्या साहेबांचा आदेश’…
लोकशाही न्यूज नेटवर्क – न्यूयॉर्क : मे २०२५ मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला लष्करी तणाव आपणच थांबवला, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ८१व्या अधिवेशनातील भाषणात ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संघर्ष थांबवल्याबद्दल आपले आभार मानल्याचे सांगत, या संघर्षामुळे सुमारे ३ कोटी लोकांचे प्राण वाचल्याचा दावा केला. ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे कौतुक करत त्यांना ‘उत्तम व्यक्ती’ असे संबोधले. भारत-पाकिस्तानमधील संघर्षासह अनेक आंतरराष्ट्रीय संघर्ष थांबवण्यासाठी आपण भूमिका बजावल्याचे सांगताना, संबंधित देशांच्या नेत्यांनी आपले आभार मानण्यासाठी पत्रे लिहिल्याचा दावाही त्यांनी केला. पहलगामनंतर वाढला होता तणाव…
जळगाव-किनगाव मार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह : अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष जळगाव : कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात येत असलेल्या जळगाव-किनगाव काँक्रीट रस्त्याच्या कामाची पोलखोल लोकार्पणापूर्वीच झाल्याचे चित्र आहे. हायब्रीड ॲन्युटी योजनेअंतर्गत सुमारे 100 कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यांत तडे गेल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, तडे गेलेला भाग आता फोडून काढण्यात येत असून संबंधित कंत्राटदाराकडून पुन्हा काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनकडून या रस्त्याचे काम करण्यात येत असून कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून यापूर्वीही आक्षेप नोंदविले आहेत. रस्त्याच्या भरावासाठी परिसरातील लहान-मोठ्या टेकड्या उद्ध्वस्त करून पर्यावरणाची हानी करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. या…
दामिनी पथकाची कारवाई; डमी ग्राहकाच्या माध्यमातून गैरप्रकाराचा घेतला शोध जळगाव : शहरातील रिंगरोड परिसरातील एका स्पा सेंटरवर जळगाव पोलिसांच्या दामिनी पथकाने कारवाई करत सहा तरुणींची सुटका केली. मसाजच्या नावाखाली स्पामध्ये कथित गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पडताळणी करून छापा टाकण्यात आला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर दामिनी पथकाने संबंधित स्पा सेंटरच्या हालचालींवर काही दिवस लक्ष ठेवले. माहितीची खातरजमा करण्यासाठी डमी ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी कारवाईपूर्वीची प्रक्रिया राबवली. यावेळी मिळालेल्या माहितीसह आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले. त्यानंतर पथकाने अचानक स्पा सेंटरमध्ये प्रवेश करून कारवाई केली. या छाप्यात सहा…
जळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नामांकित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स या दागिन्यांच्या शोरूममध्ये भरदिवसा धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ४९ हजार ६१५ रुपये किमतीची २२ कॅरेट सोन्याची चैन चोरून नेल्याची बाब समोर आली आहे. ही घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ५ ते ५.२५ वाजेदरम्यान घडली. शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ सुरू असताना, संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने कोणाचीही संमती न घेता लबाडीच्या इराद्याने सोन्याची चैन लंपास केली. चोरीचा प्रकार लक्षात येताच शोरूममध्ये एकच खळबळ उडाली. याप्रकरणी शोरूमचे मॅनेजर गणेश राजाराम काळे (वय ४९, रा. अयोध्या नगर, जळगाव) यांनी १९ जानेवारी रोजी शनिपेठ पोलीस…
जळगाव | घरगुती वापरात येणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. सोयाबीन, पामतेल, सूर्यफूल तसेच शेंगदाणा तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. सोयाबीन तेलाचा दर प्रतिकिलो १४२ ते १४४ रुपयांपर्यंत गेला असून शेंगदाणा तेल २०५ रुपयांवर पोहोचले आहे. पामतेलाचे दर १३२ रुपयांवरून १३७ रुपये झाले असून सूर्यफूल तेलातही मोठी वाढ होऊन ते १६० रुपयांवरून थेट १७२ रुपये प्रतिकिलो झाले आहे. मात्र तीळ तेलाचा दर २६० रुपयांवर स्थिर आहे. गेल्या सुमारे दीड वर्षांपासून सोयाबीन तेलाच्या दरात फारशी वाढ झाली नव्हती, तर इतर खाद्यतेलांच्या किमतीत किरकोळ चढ-उतार सुरू होते. मात्र मागील काही दिवसांत अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये…
दीपक कुलकर्णी जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेल्या नसल्या, तरी जिल्ह्याच्या राजकारणात निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. आरक्षणासंदर्भातील मर्यादांवर दि. 21 जानेवारी रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, निवडणूक अधिसूचनेआधीच इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराची कार्यक्षमता, कामाचा अनुभव किंवा जनसंपर्कापेक्षा ‘जातीय समीकरण’ अधिक निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच विविध पक्षांतील कार्यकर्ते आपापल्या जातीच्या उमेदवारासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा ही पक्षांतर्गत बैठकींपेक्षा चहाच्या टपऱ्यांपासून…
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. 29 पैकी 17 महानगरपालिकामध्ये भाजपला यश मिळाले असून जळगाव महानगरपालिकेत भाजप आणि महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. 75 नगरसेवकांपैकी 69 जागा जिंकून महायुती आघाडीवर असून त्यात 46 पैकी 46 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष आहे; त्यापाठोपाठ 22 पैकी 22 जागा जिंकून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीतील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 5 पैकी अवघ्या एका जागेवर विजय प्राप्त करता आला. पाच उबाठाचे आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. महापौर हा महायुतीचाच होणार असला तरी सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजप महापौर पदाचा दावेदार आहे. भाजपमध्ये अनेक वरिष्ठ नगरसेवक महापौरपदाच्या शर्यतीत असले तरी आता भाजपच्या…
जळगाव : राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी मोहिमेत जळगाव जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता उघडकीस येत आहे. प्रमाणपत्रांमधील दिव्यांगत्वाच्या टक्केवारीत तफावत आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आणखी चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील आरोग्य सहायक भालचंद्र नारायण पवार, वाघोड येथील आरोग्य सहायिका छाया घनश्याम भोळे, तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक संदीप विनायक सोनवणे तसेच पिंपरखेड आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक गणेश मुरलीधर महाजन यांचा समावेश आहे. यापूर्वी तपासणी मोहिमेत दोषी आढळलेल्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यात आता नव्याने चार…
जळगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरी करत सर्व 46 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या अभूतपूर्व यशानंतर आमदार भोळे यांनी आज शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भोळे यांचा विशेष सत्कार करून जळगावच्या विकासासाठी नवा संकल्प सोडला. जळगाव महापालिकेच्या 46 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक प्रचार केला होता. आमदार राजूमामा भोळे यांनी निवडणुकीची संपूर्ण सूत्रे आपल्या हाती घेतली होती. ‘विकास’ आणि ‘पारदर्शक प्रशासन’ या मुद्द्यांवर त्यांनी मतदारांशी संवाद साधला. निकालाअंती, सर्वच्या सर्व 46 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्याने राजकीय वर्तुळात या विजयाची मोठी चर्चा होत आहे. विरोधकांना…
जळगाव : हनी ट्रॅपसह इतरही काही गंभीर गुन्हे दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यात सध्या चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. लोढाशी संबंध जोडून जुने व्हिडीओ तसेच छायाचित्रे बाहेर काढून एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही दोघांकडून केला जात आहे. एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढाचे पूर्वापार घनिष्ट संबंध असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. आता मंत्री महाजन यांनी प्रफुल्ल लोढा हा खडसे यांना गुलाब पुष्प देतानाचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित करत जोरदार हल्लबोल केला. गिरीश महाजन यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, एकनाथ खडसे… तुमच्या या ‘गुलाबी गप्पा’…
नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता असून, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नवीन उपराष्ट्रपतींची निवड होईल असे मानले जाते. या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्याची जबाबदारी आयोगाची आहे. गृहमंत्रालयाने धनखड यांच्या राजीनाम्याची औपचारिक घोषणा करताच, निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित 1952च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, निवडणूक आवश्यक ठरली तर अधिसूचना प्रसृत झाल्यापासून 32 दिवसांच्या आत त्या पदासाठी निवडणूक घेणे बंधनकारक असते. नियमांनुसार, निवडणुकीची अधिसूचना प्रसृत झाल्यापासून 14 दिवसांच्या आत पात्र उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल…
नवी दिल्ली : तुम्ही संसदेत रस्त्यावरील वर्तन करत आहात. तुम्ही ‘माननीय’ आहात आणि तुमचे वर्तन ‘माननीय’च असले पाहिजे, या शब्दांत संतप्त लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांना उद्देशून फटकारले. सामान्यतः पीठासीन अधिकाऱ्यांचे शब्द वगळले जात नसले तरी बिर्ला यांची ही विशिष्ट टिप्पणी अंतिम कामकाजातून (बुलेटिन) हटविली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. बिहारमधील मतदारयादीची फेरतपासणी आणि इतर काही मुद्द्यांवरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ केल्याने लोकसभा व राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे पहिले तीन दिवस पाण्यात गेले आहेत. या काळात सरकारने गोंधळातच काही कामकाज केले तरी विधेयके गदारोळात मंजूर करू नयेत, या संसदीय संकेताला त्यामुळे गालबोट लागले. या पहिल्या आठवड्याच्या उर्वरित…
सोलापूर : जुळे सोलापूरमध्ये एका 16 वर्षांच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी दुपारी ही घटना म्हाडा कॉलनीत घडली. विद्यार्थ्यांने मामाच्या घरी गळफास घेतला. शिवशरण भुताळी तळकोटी असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा ससाणे कॉलनी, केशव नगर, पुणे येथील होता. सध्या तो जुळे सोलापुरातील म्हाडा कॉलनीत राहत होता. त्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्याने त्याच्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. आईच्या निधनानंतर तो तणावात होता, त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. शिवशरणने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, ‘मी शिवशरण. मी मरत आहे. कारण मला जगण्याची इच्छा नाही. माझी…
जळगाव : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि डॉ. केतकी पाटील फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्याद्वारे विविध नामांकित आस्थापनांमध्ये एकूण 172 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी आमदार सुरेश भोळे, डॉ. केतकी पाटील, संदीप गायकवाड (सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास), नवनीत चव्हाण (जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी) आदी उपस्थित होते. या मेळाव्या करिता हिताची अस्टोमो प्रा.लि. बांभोरी, नोव्हेंचर इलेक्ट्रीकल ॲण्ड डिजीटल सिस्टीम प्रा.लि. जळगाव, नोवेल सिडस, छबी इलेक्ट्रीकल जळगाव, स्पेक्ट्रम प्रा.लि.…
जळगाव : वाढत्या अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी होत असलेले प्रयत्न कमी पडत असून मोठ्या प्रमाणावर चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी सुरुच आहे. गिरणा नदीतून होत असलेली तस्करी थांबविण्यासाठी धरणगाव तहसीलदारांनी थेट नदीत उडी घेवून वाळू तस्करांचा पाठलाग गेला. याबाबत असे की, अवैध वाळू उपश्याविरोधात प्रशासनाकडून नेहमीच कारवाईचा बळगा उचलला जात असला तरी ही वाहतूक थांबण्याचे नाव घेत नाही. तहसीलदारांचा गिरणा नदी पात्रात पोहत वाळू चोरांवर कारवाईच्या प्रयत्नात असल्याचा व्हिडिओ सध्या समाजमांध्यमावर येत आहे. धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे गुरुवार दि. 24 रोजी जळगाव येथून धरणगाव जात असताना महामार्गनजीक असलेल्या बांभोरी पुलावरून गिरणा नदी पात्रात पुलावरून पाहिले असता अनेक ट्रॅक्टर नदीपात्रात…
सागर महाजन भडगाव : राज्यात महिला छळाच्या घटनांच्या उच्छांद मांडला असून मेो सिटीमधील हे लोण ग्रामीण भागात पोहचले असून भडगावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरुन पती-पत्नीत वाद झाल्याने पतीने पत्नीला थेट गाडीखाली दाबले असून यात महिला गंभीर जखमी झालेली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पेठ भागातील माहेर असलेल्या 32 वर्षीय विवाहिता व पती यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक भांडण झाल्याने पाचोरा येथील पतीने पत्नीच्या अंगावर थेट टाटा नेक्सोन गाडी चालवत ती गाडी पुन्हा रिव्हर्स घेऊन ठार करण्याच्या उद्देशाने गाडीखाली चिरडत फरफटत नेले. या गंभीर प्रकारामुळे 32 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून त्या…
लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वचन महायुती सरकारने दिले होते; परंतु कर्जमाफी देतांना आर्थिक गणितांचे ताळेबंद आखणे महत्वाचे आहे, शेतकऱ्यांनी कर्जमाफी दिली जार्इल मात्र त्याला थोडा वेळ लागेल अशी कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. केंद्र सरकारला 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी श्री. महाजन बोलत होते. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, डॉ. राधेश्याम चौधरी, दीपक सुर्यवंशी, रोहित निकम, मनोज भांडारकर उपस्थित होते. जळगाव शहरातील रस्त्यांसंदर्भात ते म्हणाले की, काही रस्ते तांत्रिक अडचणीमुळे तर काही रस्ते निधी अभावी दुरुस्त करण्याचे…
भडगाव गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालक विद्यार्थिनींना तालुक्याच्या शाळांमध्ये पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, त्या प्रमाणात बस उपलब्ध होत नसल्याने पाचोरा वाडे व पाचोरा कोळगाव या दोन मार्गावरील बस फेऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थिनींचा प्रवास जीवघेणा झाला आहे. या मार्गावर बस फेऱ्या वाढवाव्यात आणि विद्यार्थिनींना बसमध्ये प्रथम प्रवेश मिळावा, यासाठी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ प्रसारित आदर्श कन्या शाळा येथील संचालक व इतर पालकवर्गाने पाचोरा आगार अंतर्गत भडगाव येथे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, भडगाव शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थिनींची संख्या वाढली आहे. परंतु, बसच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे विद्यार्थिनींना जीवघेणा प्रवास करावा लागतो. बसमध्ये जागा नसल्यामुळे त्यांना लटकून प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या…
पारोळा : तालुक्यातील मेहू गावातील सरपंच आणि त्याच्या कुटुंबातील तिघांना लाच प्रकरणात जळगाव एसीबीने अटक केली आहे. या प्रकरणात सरपंच जिजाबाई गणेश पाटील, तिचे पती गणेश सुपडू पाटील, मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्राचा खाजगी पंटर समाधान देवसिंग पाटील यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना लाच प्रकरणात अटक झाल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. 2017-18 ते 2022-23 या कालावधीत मेहू गावाचे सरपंच असलेले 47 वर्षीय तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीच्या व्यायामशाळेच्या बांधकामासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून सात लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता. 2023 मध्ये जिजाबाई पाटील सरपंच म्हणून निवड झाल्या. त्यानंतर तक्रारदार यांनी व्यायामशाळेच्या…
लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई : अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला पक्षांतर्गत संघर्ष म्हणून ख्याती असणाऱ्या फडणवीस-खडसे वादाला आता तिलांजली मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील सागर बंगल्यावर एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा सुरु झाली. या बैठकीवळी इतरही काही महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यात 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर काही महिन्यांमध्येच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. या संघर्षाने मध्यंतरीच्या काळात खालचे टोक गाठले होते. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत देवेंद्र…
जळगाव : राज्यभरात गुलेन बारे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आला आहे. विशेष म्हणजे कुठलीही ‘ट्रॅव्हल्स हिस्ट्री’ नसताना एका 45 वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत. जळगाव तालुक्यातील एका भागात रहिवासी असलेली 45 वर्षीय महिलेला अशक्तपणा, अंगदुखी, खांदे दुखणे, पाठ दुखणे, अचानक चालण्यास-बसण्यास त्रास होणे अशी लक्षणे जाणवली. कुटुंबीयांनी गुरुवार दि. 30 रोजी संध्याकाळी 5 वाजता या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. सदर महिला कुठल्याही गावाला गेली नव्हती. त्यामुळे तिला ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही.…
जळगाव : जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी 500 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला उद्योजकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून ‘लखपती दीदी’ उपक्रमाला गती मिळेल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय समन्वय समिती डीएलसीसीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, जिल्हा लीड बँक व्यवस्थापक प्रणवकुमार झा, विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी वेळेत परतफेड करावी, जेणेकरून पुढील हंगामासाठी त्यांना कर्ज सहज…
जळगाव : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत दोन मोठ्या निवडणुका पार पडल्या. सणोत्सव आटोपल्यावर विविध धर्म, जात, शासकीय, निम शासकीय कार्यालयातर्फे क्रिकेटसह इतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सर्वच आपला विचार करतात मात्र पत्रकारांचा कुणीही विचार करत नाही. पत्रकारांच्या मनोरंजनासाठी आणि जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या पत्रकारांना एकत्र करण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच जळगाव शहरात पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी आयोजक वाल्मिक जोशी, किशोर पाटील, चेतन वाणी, वसीम…
जळगाव : आपण सर्वच समाजाचे घटक आहोत. प्रत्येक व्यक्ती समाजाचे देणे लागतो. सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे केले. शहरातील नवी पेठेतील जळगाव जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात केशव स्मृती सेवा समूहातर्फे त्यांचा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शाल, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर केशवस्मृती सेवा समूहाचे प्रमुख डॉ. भरत अमळकर, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने उपस्थित होते. श्री. कराळे म्हणाले की, जनता बँकेतर्फे करण्यात आलेला सत्कार हा सुखद धक्का देणारा आहे. अशा प्रकारच्या सत्काराची…
नागपूर: आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी 5 डिसेंबर रोजी शपथ घेतली होती, तर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, खातेवाटप जाहीर न झाल्यामुळे विरोधकांनी सतत टीका केली होती. आता खातेवाटप जाहीर झाल्यामुळे सर्व मंत्र्यांना अधिकृत खाती मिळाली आहेत. महत्वाची खाती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क तसेच खातेवाटप न झालेली सर्व खाती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे: नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम. उपमुख्यमंत्री अजित…
जळगाव : जिल्ह्यामध्ये अपघाताच्या प्रमाणात दररोज वाढ होताना दिसत आहे. यातच मित्राच्या बहिणीच्या हळदीवरुन परत येत असताना मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास सावदा-पिंपळ रस्त्यावर चारचाकी वाहनाने झाडाला जोरदार धडक दिल्याने तिघे जण जागीच ठार झाले, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी असल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की होंडा कंपनीच्या गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील पाच मित्र भुसावळ येथील एका मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. भुसावळकडून सावदा मार्गे रावेरकडे येत असताना त्यांच्या एमएच 20 सीएस 8002 गाडीने भरधाव वेगात झाडाला जोरदार टक्कर दिली. यात रावेर शहरातील शुभम सोनार (वय 25) मुकेश रायपूरकर (वर…
जामनेर: शहरातील शिक्षक दाम्पत्याच्या घरात भरदिवसा चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम लंपास केली असून, ही धाडसी चोरी चोरट्यांनी सीसीटीव्ही तोडून केली आहे. शहरातील बेस्ट बाजार, नवकार प्लाझा येथील शिक्षक दांपत्याच्या घरात १९ मे रोजी, गुरुवारी सकाळी साधारणतः नऊ ते दहा वाजेदरम्यान ही घटना घडली. शिक्षक किरण श्रीराम महाजन आणि त्यांच्या पत्नी दोघेही शिक्षक असल्याने सकाळी साडेसहा वाजता शाळेसाठी घराला कुलूप लावून बाहेर पडले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व वीस हजार रुपये रोख आणि ५० ग्रॅम सोने चोरून नेले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी इमारतीच्या परिसरातील…
महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला प्रचंड यश आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. देवेंद्र फडणवीस यांची नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 39 जणांचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात भाजपच्या 19 शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यात जळगाव जिल्ह्यातील विद्यमान मंत्री असलेले अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांचे नेते अजित पवार यांनी अनिल भाईदास पाटील यांना विचारले अनिल भाईदास पाटील तुमचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाहीत चालेल ना! त्यावर अनिल भाईदास पाटील यांनी तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य राहील असे त्यांना सांगितले. मंत्रिमंडळात शेवटच्या क्षणापर्यंत यादीत आपले नाव असताना आपले यादीतून नाव वगळले कसे…
मन की बात महायुतीमधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांत ज्यांना मंत्री होता आले नाही अशा नेत्यांची घालमेल होते आहे. आपण मंत्री झालो नाही, हे त्यांना सहन झालेले नाही. कोणी चिडून बोलत आहे, कुणी पक्षाच्या नेत्यावर नाराजी प्रकट करीत आहे, कुणी नागपूरच्या अधिवेशनाला न थांबता सरळ मतदारसंघातील आपल्या घरी निघून गेले, तर कुणी टीव्हीच्या कॅमेरापुढे आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना दिसत आहे. राज्यात यशवंतराव चव्हाणांपासून आज देवेंद्र फडणवीसांपर्यंत तीसपेक्षा जास्त सरकारे सत्तेवर आली. देवेंद्र फडणवीस यांनी तर मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. शरद पवार, वसंतदादा पाटील यांनीही चार-चार वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण गेल्या सहा दशकांत सरकार स्थापनेनंतर…
लोकशाही न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालकाविरुद्ध होणार आता हेल्मेट न परीधान करून चालवणार गाडि तर कारवाई, दुचाकि वाहन चालकांचे अपघाताचे प्रमाण वाढत असून मृत्यूमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांची हेल्मेट परिधान न करता वाहन चालविणे हे मोटार वाहन कायदा- १९८८- कलम १२९ अन्वये गुन्हा असतांनी जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत ३८४ दुचाकीस्वार विना हेल्मेट मृत्युमुखी झाले असता १८४ गंभीररित्या जखमी असल्याची पोलिस सूत्रांनी माहीती दिली. चंद्रपूर वाहतूक पोलिसांचा हेल्मेट न परीधान करून दुचाकीवरून प्रवास करित असतांना कारवाई करने हा उद्देश नसून अपघाताचे प्रमाण कमी करून मूतृदर कमी करणे असा आहे. यावेळी चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व वाहतुक नियंत्रण शाखा पोलिसांनी…
जळगाव – जिल्ह्यातील लाचखोरीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत वाढले असून, नुकत्याच झालेल्या कारवाईत वीज मीटर फॉल्टी असल्याचा अहवाल सकारात्मक देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना वीज विभागाच्या सहायक अभियंता, दोन लाईनमन आणि एक वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे वीज मीटर खराब असल्याचे सांगून सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, लाईनमन संतोष सुकदेव इंगळे आणि वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी यांनी २०,००० रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना ते अडकले. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाडळसे (ता. यावल) येथे ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक श्री. योगेश ठाकूर, पीएसआय श्रीमती नेत्रा जाधव,…
अमळनेर : गुरुकृपा कॉलनीत १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुकृपा कॉलनीत राहणाऱ्या रत्ना किशोर देसले (वय ४५) या बाजार समितीच्या भिंतीमागील रस्त्यावरून पायी जात असताना, काळ्या रंगाची लाल पट्टेवाली दुचाकीवर आलेल्या २० वर्षांखालील दोन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेली. या घटनेनंतर अमळनेर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नवी दिल्ली : महाकुंभमेळ्यादरम्यान प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असा दावा करणाऱ्या सर्व वृत्तांना रेल्वेने स्पष्टपणे नाकारले आहे. सर्व बातम्या निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. महा कुंभमेळ्यादरम्यान प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असा दावा करणारे वृत्त काही प्रसारमाध्यमे प्रसारित करत आहेत, असे भारतीय रेल्वेच्या लक्षात आले आहे. भारतीय रेल्वे हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याने स्पष्टपणे नाकारते, असे निवेदन भारतीय रेल्वेने जारी केले आहे. वैध तिकीटाशिवाय प्रवास करणे प्रतिबंधित आणि दंडनीय गुन्हा आहे, असे रेल्वेने म्हटले आहे. महा कुंभमेळा किंवा इतर कोणत्याही प्रसंगी मोफत प्रवासाची तरतूद नाही, असे निवेदनात म्हटले आहे. महाकुंभमेळ्यानिम्मित…
जळगाव : दीपक कुळकर्णी सेत आले सुगी सांभाळावे चारी कोण! पिका आले परी केले पाहिजे जतन!! सोंकरी सोंकरी विसावा तोवरी! नको खाऊ उभे आहे तो!! गोफणेसी दिंडी घाली पागोऱ्याच्या नेटें! पळती हाहाकारें अवघी पाखरांची थाटे !! पेटवूनि आगटी राहे जागा पालटूनि! पडिलिया मान बळ बुद्धि व्हावी दोनी!! खळे दानें विश्व सुखी करी होता रासी! सारा सारूनिया ज्याचे भाग देई त्यासी!! तुका म्हणे मग नाही आपुले कारण! निज आले हातां भूस सांडिले निकण!! शेतकऱ्याला सदैव जागरूक राहण्याचा, नित्य सावध राहण्याचा सल्ला देणारा हा अभंग शब्दरचना आणि आशय या दोहोंच्या विलक्षण लावण्याने नटला आहे. आपले जीवन सुखीसमाधानी व यशस्वी करू इच्छिणाऱ्या सर्वच…
