महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन? मंत्री वडेट्टीवारांचे संकेत

मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.…

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव : महाराष्ट्र शासनाने सन 2021-22 या वर्षाकरीता अपघातग्रस्त शेतकऱ्यास/त्यांच्या कुटूंबास आर्थिक लाभ देण्याकरीता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना जळगाव जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभाग घेण्याची कालावधी हा 7…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यामुळे मुंबईत अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.  मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट बंद…

चाळीसगाव विमानतळ परीसरात पाणी पुरवठा सुरळीत करावा, नागरीकांची मागणी

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) येथील विमानतळ व जुना मालेगाव रोड विभागातील नागरीकांनी आज  रोजी पिण्याच्या पाण्याची समस्या साठी नगरपालिकेचे  पाणीपुरवठा सभापती व उपमुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कारण की रेल्वे पलिकडील काही भागात पाणीपुरवठा…

आ.मंगेश चव्हाण यांच्यासह त्याच्या सर्व समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी

धरणगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कडक निर्बंध जरी केलेले असताना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह त्यांच्या सर्व समर्थकांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. आ. चव्हाण यांनी कोरोना काळात शासनाच्या ‘ब्रेक…

अमरावतीला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका : केंद्रीय आरोग्य पथकाचा इशारा

अमरावती (प्रतिनिधी) : कोरोना साथिवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व नागरिकांकडून कोविंड प्रोप्रिएट बिहेवियर चे पालन होणे आवश्यक आहे .त्याचे पालन न झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सगळीकडे मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व…

केंद्रीय पथकाने घेतला कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा ; दोन सदस्यीय पथक

बुलडाणा  : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग परिस्थिती आहे. वाढत्या रूग्णसंख्या व अनुषंगिक बाबींविषयी आढावा घेण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक आज जिल्ह्यात दाखल झाले. कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा आज केंद्रीय पथकाने घेतला. याबाबत…

तुम्हाला LPG सबसिडीची रक्कम मिळत आहे की नाही? घरबसल्या अशाप्रकारे तपासा

नवी दिल्ली । एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे, तथापि, एप्रिल महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडर 10 रुपयांनी स्वस्त झाले, या किरकोळ कपात सर्वसामान्यांना फारसा फरक पडला नाही. परंतु तुम्हाला एलपीजी सबसिडीद्वारे मोठा दिलासा मिळू शकेल.…

इंधन दर ; जाणून आजचा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. मात्र देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही. मागील १० दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत. आज शुक्रवारी पेट्रोल आणि…

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्ह्यात ‘या’ बाबींना काही अटींवर सुरु ठेवण्यास…

जळगाव :- कोविड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 5 एप्रिलच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यासाठी विशेष निर्बध लागू केले आहे. या निर्बधांतून खालील बाबींना काही अटींवर सुरु ठेवण्यास परवानगी…

खडी वाहून नेणारा ट्रक एक्सप्रेसला धडकला

अमळनेर । अमळनेर ते धरणगाव स्थानकांच्या दरम्यान सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी खडी वाहून नेणारा ट्रक आज सकाळी हावडा एक्सप्रेसला धडकला. ट्रकने दिलेल्या धडकेत काही प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान सुदैवाने एक मोठा रेल्वे अपघात टळला. याबाबत…

देशात कोरोनाचा कहर सुरूच ; गेल्या २४ तासांत १.३१ लाख रुग्ण, ८०० हून अधिक मृत्यू

नवी दिल्ली : कोरोना संक्रमण देशात अक्राळ विक्राळ रुप धारण करताना दिसतंय. गेल्या सलग तीन दिवसांपासून देशात आढळणाऱ्या रुग्णसंख्येनं लाखांचा टप्पा पार केलेला दिसतोय. आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत…

बालक पोषण आहार उसळ सप्ताह संपन्न

पाचोरा(प्रतिनिधी) : धाबे ता. पारोळा या आदिवासी वस्तीतील बहुतेक बालकांचे पालक हे पर जिल्हयात ऊसतोड व वीटभट्टी कामावर गेले असल्याने बालक सकस आहार पोषणापासुन या गरजेच्या कोरोना काळात वंचित आहेत. शाळेत गटागटाने ऑफलाईन शिक्षण, शाळा बाहेरील शाळा…

आमडदे येथे शाळेच्या मागे पत्त्यांचा डाव रंगला ; पोलिसांनी धाड टाकताच डाव भंगला

भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आमडदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे निबाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत काही लोक  पैसे लावून जुगार( पत्ते) खेळतांना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आढळून आले . यात ८ जुगारीना अटक करून सुटका झाली असून बाकी ८…

राज्यातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता

नागपूर : महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. नागपुराता पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.  गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील तापमानात…

जिल्ह्यात आज ११९० नव्या बाधितांची नोंद ; मृताच आकडा वाढताच

जळगाव । जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरतोय. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतच आहे. आज जिल्ह्यात ११९० नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यात जळगाव शहरात २९९ सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून रुग्ण संख्या…

भुसावळात मिनी लॉक डाऊनचा व्यापारी संघटनांतर्फे तीव्र निषेध

संतप्त व्यापारी उद्यापासून उघडणार दुकाने ; प्रांताधिकारी यांना दिले निवेदन भुसावळ (प्रतिनिधी)- येथे महाराष्ट्र राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू होत आहे. अत्यंत भयावह अवस्था पहावयास मिळत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र…

लासगाव येथ सॅनिटायझर फवारणी

लासगाव ता.पाचोरा (वार्ताहर) : लासगाव येथे ग्रामपंचायतीने नुकतेच कोरोनाचा प्रादुरभाव वाढूनये व गावात कोरोना दहशतिचे वातावरण होऊ नये या उद्देशाने ग्रा.प.माजी उप.सरपंच गोपाल देवसिंग पाटील व कर्मचाऱ्यांचा हस्ते गावात कोरोनापासून संरक्षण मिळावे…

नांदेड -श्री गंगानगर दरम्यान साप्ताहिक आणि द्वि साप्ताहिक विशेष गाड्या धावणार

भुसावळ (प्रतिनिधी)- खाली दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने नांदेड -श्री गंगानगर दरम्यान साप्ताहिक आणि द्वि साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 1) नांदेड -श्री गंगानगर साप्ताहिक विशेष…

मोठी बातमी : मुंबई लोकल सामान्यांसाठी पुन्हा बंद होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात तसेच मुंबईत कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. सामान्यांचा रोजगार बुडत होता म्हणून मागच्या वर्षी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे काही अंशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा…

दुकाने बंद ठेवण्याचे आदेश तात्काळ रद्द करावे ; जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची मागणी

जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या निर्बंधामुळे जवळपास सर्वच दुकाने बंद आहेत. गेल्या वर्षभरापासून व्यापारी बांधव अगोदरच संकटात आला असून या निर्णयामुळे व्यापाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. सर्व व्यापारी नियमांचे पालन…

‘ब्रेक द चेन’ आदेशात आणखी काही घटकांचा समावेश

मुंबई : मदत व पुनर्वसन विभागाद्वारे कोव्हिड-१९ रोग प्रसार खंडीत करणे (ब्रेक द चेन) अभियानाअंतर्गत पशुसंवर्धनाशी संबंधित दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, मासे, जनावरांचा चारा आदी बाबी अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती…

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना कोरोना लस द्या

अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे,अशातच शासनाने इयत्ता १२ वी बोर्ड च्या परीक्षा ऑफलाइन घेण्याची घोषणा केलेली आहे. परीक्षांच्या आधी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना प्राधान्याने कोरोना लस देण्यात…

अनिल देशमुख आणि महाविकासआघाडीला ”सर्वोच्च” धक्का ; दाखल याचिका फेटाळली

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकासआघाडीने सीबीआय चौकशीविरोधात स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च…

सोन्याच्या किंमतीत वाढ ; चांदीही ७०० रुपयांनी वाढली, वाचा आताचे नवे दर

नवी दिल्ली । कोरोनाने पुन्हा डोकंवर काढल्यानंतर भांडवली आणि कमॉडिटी बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज गुरुवार सलग तिसऱ्या सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये आज सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम…

खामगावात गुटखा पकडला, 3 लाखाचा मुद्देमाल जप्त

खामगाव (प्रतिनिधी) :  राज्यात प्रतिबंधित असलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला खामगाव शहर पोलिसांनी आज पकडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की ऑटो क्रमांक एम एच-28-टी-3041 मध्ये अवैधरित्या…

लाॅकडाऊन विरोधात पारोळा व्यापारी महासंघ रस्त्यावर

पारोळा (प्रतिनिधी) : निर्बंधाच्या नावाखाली लाॅकडाऊन करून व्यापार्यांची फसगत करण्यात आली असुन या लाॅकडाऊन विरोधा संपुर्ण राज्य भर निर्देंशने व निवेदने देण्यात येत आहेत. पारोळा व्यापारी महासंघाच्या वतीने ही आज पारोळा तहसिलदार ,पोलिस स्टेशन,व…

लॉकडाऊनबाबत गोलानी व्यापारी आक्रमक आम्हाला लॉकडाउन नको

जळगाव:- 6 रोजी संध्याकाळी आपल्या वतीने जिल्ह्याच्या सर्व व्यवसायिकांसाठी/बाजारपेठासाठी आपण आदेश काढले आदेश काढले त्या म्हदे व्यवसायीक वर्गाला अन्यया ची वागणूक ही मागील प्रमाणे या वर्षी ही दिली आहे. आज व्यवसायिक व व्यवसायिकांच्या दुकानातील…

भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण गंभीर

जळगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण गंभीर जखमी झाला आहे. योगेश सुरेश पवार (२७, रा.डोमगाव, ता.जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव असून याप्रकरणी अद्याप पोलीसात नोंद करण्यात…

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना लसीचं प्रमाण कमी का?

मुंबई | कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लसीच्या पुरवठ्या संदर्भातील वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली आहे. तसेच इतर…

जळगावातील गुरुनानक नगरमधील तरूणाची आत्महत्या

जळगाव । शहरातील गुरूनानक नगरातील रहिवाशी रितीक प्रेम पवार (वय-३०) या तरुणाने बुधवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हा प्रकार घरातील…

टोमॅटो खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ; वाचा ‘हे’ फायदे

आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकला जातो. भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस आणि सूप म्हणून देखील टोमॅटोचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त एक नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून देखील तो उपयुक्त ठरतो. टोमॅटोमध्ये…

एकही पिडित महिला न्यायापासून वंचित राहू नये यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत करा…

अमरावती (प्रतिनिधी) : महिलांची कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक छळवणूक प्रतिबंध अधिनियम 2013 अंतर्गत शासकीय निमशासकीय कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत कराव्यात . चुकीचे काम करणाऱ्या कोणाही व्यक्तीस पाठीशी घालण्याचा…

लॉकडाउनला शिथिलत देऊन कडक निर्बंधातून सूट द्यावी

अमरावती (प्रतिनिधी) :  राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी अमरावती मध्ये मात्र कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे . त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात यावे तसेच लॉकडाउन बाबत पुनर्विचार…

लॉकडाऊन निर्णयावर शासनाने फेरविचार करावा अन्यथा व्यापाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरावे लागेल- खा.उन्मेश…

पाचोरा (प्रतिनिधी) : लॉकडाऊन मुळे लहान मोठे व्यापारी, कामगार, उद्योजक संकटात आले आहेत. व्यापार करतांना घेतलेले कर्ज डोक्यावर असून कामगार देखील आर्थिक संकटात आहेत. आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाची चिंता सर्वसामान्य जनतेला असताना शासनाने लॉक…

एका महिन्याच्या रेकॉर्ड किंमतीने घसरले सोने, तपासा झटपट आजचे दर

नवी दिल्ली । आज एका दिवसाच्या घसरणी नंतर पुन्हा किंमती खाली आल्या आहेत. एमसीएक्सवरील सोन्याचा भाव 0.1 टक्क्यांनी घसरला म्हणजेच 96 रुपयांनी घसरून 46,320 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. त्याचबरोबर चांदीचा वायदाा 0.34 टक्क्यांनी घसरून म्हणजे 228…

पेट्रोल डिझेलचे दर जाहीर ; वाचा आजचे दर

मुंबई । सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केली नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना सलग 9 व्या दिवशी दिलासा मिळाला. राष्ट्रीय राजधानीत गुरुवारी पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 90.56 रुपये तर डिझेलची किंमत प्रति लिटर 80.87…

राज्यात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

पुणे: महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. पुण्यासह ,मध्य महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात पाऊस कुठे होणार?…

चाळीसगाव येथे वाईन शॉपवर अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची दारूसह रोकड केली लंपास

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) चाळीसगाव शहरातील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या क्रिश वाईन शॉपवर काल रात्री अंदाजे १ वाजेनंतर अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ५० लाखाच्या आसपास दारूचे व बियरचे खोके सह दिवस भरातील दारू विक्रीची रोकड लंपास केल्याने…

चिंता वाढली : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,26,789 नवीन रुग्ण

नवी दिल्ली : देशातील कोरोना नियंत्रणाबाहेर गेल्याचे आकडेवारी दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत आढळून येत आहे. आज पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंद करत…

आयारामानां संधी देण्यासाठी मला विश्वासात न घेता शहराध्यक्ष पदावरून पाय उतार करणे म्हणजे प्रामाणिक…

 जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील यांना तात्काळ भेटणार; प्रदेशाध्यक्ष यांना लेखाजोखा पाठविणार भुसावळ (प्रतिनिधी) - वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावर नवीन नियुक्ती करतांना मला विश्वासात न घेता मला पदावरून पायउतार करणे म्हणजे…

जिल्ह्यात आज ११४१ नवे रुग्ण आढळले, १४ रुग्णांचा मृत्यू

जळगाव । जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होतांना दिसून येत नाहीय. जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आज बुधवारी १ हजार १४१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासादायक असे की आजचं १ हजार ०७१ रुग्ण बरे…

शेतकऱ्यांना बारा दिवस जेलमध्ये डांबणाऱ्या तिघाडी सरकारचे आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी घातले तेरावे

 चाळीसगाव:-(प्रतिनिधी ) चाळीसगाव तालुक्यातील ३१ शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना १२ दिवस जेलमध्ये डांबून ठेवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी श्रीक्षेत्र ऋषीपांथा बहाळ…

पत्नीने केला पतीचा गळफास देवून खून; गोंडखेळ येथील घटना

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील गोंडखेळ येथील महिलेने पती आपल्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने गळफास देवून खून केल्याची घटना काल(६)रोजी रात्री साडेअकरा- बारा वाजेच्या सुमारास घडली.मयत पती दिलीप विश्वनाथ सोनवणे (वय३५) राहणार गोंडखेळ यांचा…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालयात अभ्यागतांना 30 एप्रिलपर्यंत प्रवेशास मनाई

जळगाव  - जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शासकीय महामंडळे येथे अभ्यागतांना 30 एप्रिल 2021 पर्यंत प्रवेशास मनाई करण्याचे आणि अभ्यागतांसाठी ऑनलाईन सेवा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष…

जिल्ह्यात सद्यस्थितीत 11 हजार 646 बाधित रुग्णांवर उपचार सुरू

जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 95 हजार 958 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 82 हजार 600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 11 हजार 646 रुग्णांवर उपचार सुरु असून 1 हजार 712…

मोठी बातमी : नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास करणार

मुंबईः राज्यात कोरोनाची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, परीक्षेविनाच त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, असा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा…

महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज कुंभमेळ्यासाठी हरिद्वारला झाले रवाना

फैजपूर प्रतिनिधी |  कुंभमेळ्याच्या हरिद्वार येथील महा पर्वाला सुरुवात होत असून त्यात सहभागी होण्यासाठी येथील महामंडलेश्वर जनार्दन महाराज सोमवारी दुपारी हरिद्वारकडे रवाना झाले. ते ३० एप्रिल रोजी परत येणार असून त्या ठिकाणी शाही स्नानासह…

फैजपूर नाभिक युवा संघटनेतर्फे आघाडी सरकारचा जाहीर निषेध

फैजपूर प्रतिनिधी :  महाराष्ट्रात दि ०४/०४/२०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ व सर्व पक्षीय नेत्यांना सोबत घेऊन झालेल्या बैठकीत लॉकडाउन ऐवजी कडक निर्बध जाहीर करीत असताना " सलून दुकाने ( केश कर्तनालये ) बंद ठेवावी " या महाराष्ट्र शासनाच्या…

सेवानिवृत्त शिक्षकांसाठी नगरपरिषदेने दिले 72 लाख

अमळनेर (प्रतिनिधी):- नगर परिषदेतील सेवानिवृत्त शिक्षकांच्या निवृत्ती व कुटुंब निवृत्तीवेतनासाठी नगर परिषद हिश्याची रक्कम 72 लाख रुपये देऊन निवृत्तीवेतन नियमित करण्याचे ऐतिहासिक काम नगराध्यक्ष सौ पुष्पलता साहेबराव पाटील, मुख्याधिकारी डॉक्टर…

खामगावात वरली मटक्याला तुर्त ब्रेक लागला

खामगाव (प्रतिनिधी)- अलिकडच्या काळात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणूक करुन जास्त नफा कमाविण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशा…

कोरोना तपासणी ला नागरिक जुमानत नाही पॉझिटिव्ह निघणार याची धास्ती

जळगाव:- कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर आपल्याला क्वॉरंटाइन करतील या भीतीने तालुक्यातील अनेक लोक चाचणीपासून पळ काढतात. अशाने संसर्ग अधिक पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या चाचणीला नागरिकांनी अजिबात घाबरू नये, चाचणी करून घ्या,…

सभ्रम नको, दुकानांबाबतच्या निर्बंधांवर राज्य सरकारने केला खुलासा

मुंबई : वाढत्या कोरोना संसार्गाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध असा शब्द वापरत निर्बंध घातले आहेत. 30 एप्रिल पर्यंत हे नियम लागू असून. त्याची अंमलबजावणी राज्यात करायला सुरुवात झाली आहे. या नवीन नियमावलीनुसार सोमवार…

पोलीस अधिक्षक डॉ. मुंढे यांच्याकडून शहरातील बाजारपेठ आणि व्यापार संकुलांची पाहणी

जळगाव : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी आज शहरातील बाजारपेठ आणि व्यापार संकुलांची पाहणी करून अनावश्यक सुरु असलेल्या दुकानांवर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी…

रिझर्व बँकेकडून नव्या आर्थिक वर्षाचे पतधोरण जाहीर

नवी दिल्ली : रिझर्व बँकेकडून नव्या आर्थिक वर्ष 20121-22 मधील पहिले पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी कोरोना ची परिस्थिती लक्षात घेता व्याजदर स्थिर ठेवण्यात आलेले आहेत. यावेळी रेपो दर 4 % तर रिझर्व रेपोदर 3. 35 % वर स्थिर ठेवण्यात आला…

वाढीव वीजबिलावर ऊर्जामंत्र्यांनी काढला तोडगा ; सांगितला ‘हा’ उपाय

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वीज ग्राहकांना आवस्तव बिलं आल्याने नागरिकांमधून एकच संताप व्यक्त होत आहे. काही पक्षांकडून आणि संघटना यांच्याकडून वाढीव विजाबीलाविरोधात आक्रमक आंदोलने देखील करण्यात आली आहेत. याच बाबीवर तोडगा…

अमरावतीतील लॉक डाऊन ला विरोध करण्यासाठी व्यापारी व कामगारांची महापालिकेवर धडक

अमरावती (प्रतिनिधी) : सततच्या टाळेबंदी मुळे बाजारपेठांमधील दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे .अशा परिस्थितीत कोरोनामुळे नव्हेतर उपासमारीने मरण्याची वेळ कामगारांच्या कुटुंबावर आलेली असल्याने .शहरातील…

शासनाच्या पुर्ण लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध

जळगाव : शासनाने महिनाभर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांसाठी लॉकडाऊन घोषित केल्याने, या निर्णयाचा व्यापाऱ्यांना मधून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे शासनाने हा लॉकडाऊनचा निर्णय मागे घेण्या बाबत राज्यभरातील व्यापाऱ्यांनी…

कंपन्यांशी चर्चा करून रेमडेसिवीरचे दर नियंत्रणात ठेवणार : पालकमंत्री शिंगणे

 बुलडाणा : कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसीविर इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्यात पर्याप्त ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत कंपन्यांशी चर्चा करून उत्पादनही वाढवायला लावले आहे. त्यामुळे या औषधाचा मागणीनुसार पुरवठा…

शेंदुर्णीत नगरपंचायतीच्या वतीने कोविड रुग्णांची शोध मोहीम व मोफत चाचणी

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत नगरपंचायत कोविड रुग्णांची शोध मोहिम हाती घेण्यात आली असुन शहरात विविध ठिकाणी नागरिकांची मोफत चाचणी करण्यात येत आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद…

सोने आणि चांदीमध्ये घसरण; जाणून घ्या आजचा भाव

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढल्याने गुंतवणूकदारांचा थरकाप उडाला आहे. याचे पडसाद भांडवली बाजारात आणि कमॉडिटी बाजारात पडसाद उमटले. आज बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनेदरात 0.25 टक्क्यांची…

शेंदुर्णीत रात्रीच्या संचारबंदीसाठी पहुरचे पो.नि.यांची शहरात धडक मोहिम

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शासनाने व जिल्हाधिकारी जळगांव यांच्या आदेशानुसार दिवसाची जमावबंदी व रात्रीची संचारबंदीसाठी शेंदुर्णीत पोलीस प्रशासनाने जोरात कंबर कसली असुन यासाठी आज संध्याकाळी पहुरचे…

खळबळजनक : राहुरी येथे पत्रकाराची अपहरण करून हत्या

अहमदनगर : अहमदनगरमधील राहुरी येथे एका पत्रकाराची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रोहिदास दातीर असे खून करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी राज्यातील एका…

इंधन दर ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे दर

मुंबई : जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र देशांतर्गत बाजारात इंधन दराबाबत कंपन्यांनी तूर्त तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. सलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे. आज बुधवारी मुंबईत पेट्रोलचा भाव…

पहुर पोलीस स्टेशनला नवीन वाहन झाले दाखल

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर पहुर पोलीस स्टेशनला सोमवारी नवीन वाहन मिळाले असुन त्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे हस्ते पुजन व श्रीफळ वाढवुन स्वागत करण्यात आले. पहुर पोलीस स्टेशनची फार मोठी…

चिंता वाढली ! देशातील कोरोना रुग्ण संख्येनं तोडले आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड

नवी दिल्ली : भारतातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती अतिशय धोकादायक वळणावर पोहचलीय, असं म्हणायला हरकत नाही. गेल्या २४ तासांत देशात तब्बल १ लाख १५ हजार ३१२ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ६३१ जणांचा मृत्यू झाला आहे. याचसोबत…

कोरोनाच्या बाणाने अमळनेरात आधुनिक श्रावणबाळाचा दुर्दैवी अंत

अमळनेर : कोरोनाच्या काळात आई वडिलांची सेवा करणाऱ्या कलियुगातील श्रावण बाळाला कोरोनाचा बाण लागून त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना 6 रोजी सकाळी घडली. शहरातील तांबेपुरा भागातील रहिवासी सुखदेव भालेराव हे सेवानिवृत्त शिक्षक आणि त्यांच्या…

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच ; आज ११७६ नवे रुग्ण, १५ जणांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. मागील काही दिवसापासून दररोज बाराशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहे. मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आलेख देखील वातच आहे. आज देखील गेल्या २४ तासात पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे.…

वरणगाव प्रभाग दोनमध्ये गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

भुसावळ (प्रतिनिधी)- वरणगाव नगरपालिकेच्या जलवाहिनीतून प्रभाग क्रमांक दोनमध्ये गटारीच्या वासासारखे दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा बऱ्याच दिवसापासून होत होता. आज मंगळवारी दुपारी 12 वाजता संतप्त स्थानिक रहिवासी यांनी नगरपालिकेत धडक देऊन पाणी पुरवठा…

खा.उन्मेष पाटील यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली

धरणगाव : आज भाजपचे खासदार उन्मेषदादा पाटील यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून काय काय कमतरता आहे याची माहिती तहसीलदार देवरे साहेब,डॉ.बन्सी,डॉ.शाह व स्टॉप यांच्याशी चर्चा करून घेतली व रेमडीसीवीर इंजेक्शन व इतर औषधी नसल्यास सांगावे…