भारतीय वंशाच्या खासदारांनी ऑस्ट्रेलियात गीतेवर हात ठेऊन घेतली शपत

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॅरिस्टर वरून घोष हे भगवत गीतेच्या साक्षीने शपथ घेणारे भारतात जन्मलेले ऑस्ट्रेलियातील पहिले खासदार ठरवले आहेत. लेजिस्लेटिव्ह असेम्बी आणि लेजेस्लेटिव्ह कॉन्सिलकडून निवड झाल्यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे नवे सेनेटर म्हणून वरून घोष यांना नियुक्ती मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पार्लमेंटचे ते सदस्य झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मानती पेन्नी वोंग यांनी वरून घोष यांचे संसदेत स्वागत केले. त्या म्हणाल्या की, लेबर सिनेट टीममध्ये तुम्ही आल्याबद्दल मी तुमचे स्वागत करते. आपले नवे सिनेटर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे आहेत. भगवत गीतेच्या साक्षीने शपथ घेणारे घोष हे पहिले ऑस्ट्रेलियन सिनेटर आहेत. मी कायम म्हणते की जेव्हा तुम्ही असता, तेव्हा तुम्ही शेवटचे नाहीच याची खात्री करावी.

सिनेटर घोष हे आपल्या समुदायाचा आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या लोकांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवतील याची मला खात्री आहे. असंही पेन्नी वोंग म्हणाल्या ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बनिज (Anthony Albanese) यांनी देखील वरुण घोष यांना शुभेच्छा दिल्या. मी वरुण घोष यांचे स्वागत करतो. नवे सिनेटर आमच्या टीममध्ये येणे ही चांगली गोष्ट आहे, असं ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.