फेसबुकच्या ओळखीतून जळगावात २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार !

0

जळगाव ;- शहरातील २५ वर्षीय तरुणीस एकाने तिच्या घरी येत इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध केल्या प्रकरणी एका विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २५ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह राहत आहे. डिसेंबर २०२२ ते ११ मे २०२३ रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतच्या काळात तरुणीशी फेसबुकवर ओळख निर्माण करीत तरुणी घरी एकटी असल्याची संधी साधत तरुणीच्या घरी येत लग्नाचे आमिष दाखवून तर दुसऱ्या वेळेस तरुणी घरी एकटी असताना तिच्या राहत्या घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध जवळीक साधत असल्याने तरुणीने याला नकार दिला असता. त्याने तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणी सोबत चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी तरुणीने एमआयडीसी पोलीस स्टेशनला एकाजणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस स्स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन हे तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.