चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी ॲड. उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील

0

चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी ॲड. उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील

फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; राज्यभरातून आरोपीला फाशीची मागणी

मालेगाव प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे १६ नोव्हेंबर रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या भीषण घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले असून गावापासून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संशयित विजय खैरनार याला पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे.

तपासात स्पष्ट झाल्यानुसार आरोपीने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत बालिकेचे प्रथम अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून निर्दयपणे हत्या करण्यात आली. कृत्याचा उलगडा होताच गावकऱ्यांमध्ये संताप उसळला असून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची सर्वांच्या मुखातून मागणी सुरू आहे.

या संवेदनशील प्रकरणाचा जलद निकाल लागावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कायदा व न्याय विभागाने सुप्रसिद्ध फौजदारी तज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. शनिवारी जारी आदेशानुसार हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.