धक्कादायक : विद्यार्थिनीला धमकावून ६ नराधमांनी केला सामूहिक अत्याचार

0

धक्कादायक : विद्यार्थिनीला धमकावून ६ नराधमांनी केला सामूहिक अत्याचार

जिंतूर तालुक्यातील घटना ; ५ जणांना अटक

परभणी | प्रतिनिधी

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात १४ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शिक्षणासाठी जिंतूर येथे राहणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सहा तरुणांनी जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करून पाच आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेज सुट्टीच्या दिवशी विद्यार्थिनी आपल्या मित्रासोबत इटोली शिवारातील भोगाव देवी परिसरात गेली होती. तेथे काही तरुणांनी दोघांना घेरत धमकावले, पैसे हिसकावून घेतले आणि विद्यार्थिनीवर अत्याचार केला. यानंतर आरोपींनी या घटनेचा मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसारित करण्याची धमकी दिली व घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेनंतर विद्यार्थिनी काही काळ घाबरलेली होती. अखेर धैर्य दाखवत तिने आपल्या कुटुंबीयांना सर्व सांगितले आणि थेट जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपी करण बुरकुले, शेषराव शेवाळे, शेख साबीर शेख सत्तार, करण मोहिते आणि दोन अल्पवयीनांवर गुन्हा दाखल केला.

पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून, उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली असून, नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.