अल्पवयीन मुलीला धमकी देत अत्याचार ; तरुणाविरुद्ध गुन्हा

0

अल्पवयीन मुलीला धमकी देत अत्याचार ; तरुणाविरुद्ध गुन्हा

जळगाव प्रतिनिधी I १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देत मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर तरुणाने अत्याचार केला. हा प्रकार एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान घडला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात फरहान उर्फ मुन्ना उसनुद्दीन सैयद (रा. आव्हाणा, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावामधील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही जळगावात टायपिंग क्लासला येते. क्लासजवळ येऊन फरान सैयद याने माझ्या सोबत फिरायला चालते का, असे विचारले. मुलीने त्यास नकार दिला. मात्र तरुण सतत तगादा लावत होता. जून महिन्यात पुन्हा हा तरुण क्लासजवळ आला व तिला धमकी देऊन दुचाकीवर मित्राच्या घरी घेऊन गेला. तेथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. नंतर तिला रिक्षाद्वारे बसस्थानकावर पाठवून दिले. त्यानंतर तरुणाने तीन ते चार वेळा मुलीला मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

नंतरही तो त्रास देत असल्याने मुलीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फरान उर्फ मुन्ना उसनुद्दीन सैयद याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.