विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला आठ वर्षांची शिक्षा

0

अमळनेरः अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील सुनिल संतोष भागवत (वय ५३, रा. देशमुखनगर, चोपडा) या शिक्षकाला न्यायालयाने आठ वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला ७५ हजारांचा दंड ठोठवला आहे. हा निकाल अमळनेर न्यायालयातील न्या. पी. आर. चौधरी यांनी दिला.

चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील हिंदी विषयाचे शिक्षक सुनिल संतोष भागवत याने दि. ४ फेब्रुवारी रोजी वर्गाला खेळण्यासाठी सोडले होते. दरम्यान, वर्गातील एक अल्पवयीन मुलगी वर्गात पाणी पिण्यासाठी आली असता, सुनिल भागवत यांनी त्या मुलीचा हात पकडून तीचा विनयभंग केला. तसेच दुसऱ्या दिवशी शिक्षक त्या मुलीच्या घरी जावून त्याने तिच्या पालकांचा मोबाईल क्रमांकावरुन तिच्यासोबत अश्लिल भाषेत संभाषण केले होते. हा प्रकार मुलीच्या वडीलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळेत जावूनमुख्याध्यापकांसह पर्यवेक्षिका यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानतर चोपडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सुनील भागवत यांच्याविरुद्ध विनयभंग व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी केला.

९ जणांची साक्ष 

हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील अॅड किशोर बागुल यांनी यात नऊ साक्षीदार तपासले. यामध्ये तपासी अधिकारी, पीडितेचा जबाब आणि फोन मधील रेकॉर्डिंग ग्राह्य धरत न्या. पी. आर. चौधरी यांनी सुनील भागवत याला दोषी ठरवित शिक्षा सुनावली.

 

बालकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा २०१२ च्या कलम ८ नुसार पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद, तसेच कलम १२ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.