बिस्किटाच्या पुड्याचे आमिष ; ७ वर्षीय चिमुकल्यावर अत्याचार

0

लोकशाही न्युज नेटवर्क
७ वर्षीय चिमुकल्याला बिस्किट पुडा देण्याच्या आमिषाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पहूर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची माहिती अशी कि , जामनेर तालुक्यातील एका गावात ७ वर्षीय चिमुकला हा आपल्या आई-वडील यांच्यासह राहतो. २५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता हा चिमुकला घरी एकटा असताना बाजूला राहणारा सुरेश शांताराम भोई याने त्याला जवळ बोलून बिस्कीट पुडा घेण्याचा बहाणा करून त्याला त्याच्या घरात नेले. घराचे दरावाजे बंद करून चिमुकल्यासोबत अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित चिमुकल्याने आपल्या सोबत घडलेला प्रसंग कुटुंबियांना सांगितला. संतप्त नातेवाईकांनी तातडीने पहूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संशयित आरोपी सुरेश शांताराम भोई यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.