Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या अपहरणाचा प्रयत्न
    गुन्हे वार्ता

    दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या अपहरणाचा प्रयत्न

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 25, 2026No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत. त्यात बीडमध्ये दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या अपहरणाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सख्ख्या बहिणी होत्या. बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र या दोन बहिणी मधील लहान बहिणीने दाखवलेलं धाडस आणि प्रसंगावधान कौतूक करण्यासारखेच आहे. त्यामुळे अपहरणाचा डाव उधळला गेला. दोन्ही तरुणी या सुरक्षित आपल्या घरी ही परतल्या.

    बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. माजलगाव शहरात दिवसाढवळ्या दोन सख्ख्या बहिणींच्या अपहरणाचा थरार उघडकीस आला आहे. सुंदरराव सोळंके महाविद्यालयासमोर तीन आरोपी उभे होते. त्यांचा या दोन बहिणींच्या अपहरणाचा डाव होता. दोन्ही मुली ज्या वेळी त्यांच्या समोर आल्या त्यावेळी या तिघांनी ही त्यांच्यावर झडप टाकली. त्यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी लहान बहिणीने डोकं लावलं. तिने त्यांना प्रतिकार केला.

    शिवाय जोरजोरात आरडाओरड केला. त्यामुळे तिथे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मुलींना कारमध्ये टाकायचे आणि पळ काढायचा असा त्यांचा डाव होता. पण त्यांच्या मनासारखे काही झाले नाही. लहान बहिणीने जबर प्रतिकार आणि आरडाओरडा केला. तो ऐकून तिथं नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांना हा प्रकार काही तरी भयंकर असल्याचं जाणवलं. नागरिक मदतीला धावले आणि अपहरणकर्त्यांचा डाव उधळला.

    त्यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांचे वाहन ही जप्त केले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे माजलगावमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान कौटुंबिक कलहातून हा कट रचला गेला होता हे तपासात समोर आले आहे. याबाबत बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी माहिती दिली आहे. तर सामाजिक कार्यकर्ता सायली पवार यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

    #crime #kidnapping #sister Beed Conspiracy majalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.