Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
    राष्ट्रीय

    सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 6, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. सुप्रीम कोर्टात वकिलाकडून सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वकिलाने सुनावणी दरम्यान मंचाच्याजवळ जाऊन बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवलं. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला कोर्टाबाहेर काढलं. यावेळी तो वकिल आरडाओरडा करत होता, ‘ ‘सनातनचा अपमान सहन करणार नाही‘.  सरन्यायाधीश गवई हे सर्व सुरु असताना शांत होते. ते म्हणाले की, ‘अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही. तुम्ही तुमचा युक्तीवाद सुरु ठेवा‘

    असं म्हटलं जातय की, खजुराहो येथील भगवान विष्णुंच्या एका नुकसानग्रस्त मुर्तीशी संबंधित एक जुन्या प्रकरणात सरन्यायाधीशांनी एक टिप्पणी केली. या टिप्पणींचा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलाय. सुरक्षारक्षक या घटनेचा इन्कार करतायत. ते म्हणतायत की, ‘कोर्टात एका माणसाने आरडाओरडा केला. त्याला आम्ही बाहेर काढलं‘

    खजुराहो येथे भगवान विष्णुंच्या नुकसानग्रस्त मुर्तीची पूनर्स्थापना करण्याबद्दलच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश गवई बोललेले. “जा, देवांनाच काहीतरी करायला सांग. तू म्हणतोस तू भगवान विष्णूंचा कट्टर भक्त आहेस, तर जा आणि आता प्रार्थना करं. हे एक पुरातत्व स्थळ आहे. एएसआय आदींची अनुमती आवश्यक आहे. क्षमा करा” त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधाची मोठी लाट उठलेली. अनेकांनी सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी केलेली.

    वाद वाढल्यानंतर मुख्य न्यायाधीश म्हणालेले की, “त्यांच्या टिप्पणीला सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं. कोणीतरी मला सांगितलं की, माझ्या टिप्पणीला सोशल मीडियावर एका खास पद्धतीने सादर केलं जातय. मी सर्व धर्मांचा सन्मान करतो“

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू

    November 9, 2026

    महाराष्ट्रासह ७ राज्यांत एसआयार मुदतवाढ

    November 7, 2026

    E-20 पेट्रोल 420 इंधन : थेट पुराव्यांसह मोठा आरोप

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif