Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»कोर्टाच्या स्थगितीतील जमिनीवर नांगरणीचा प्रयत्न
    गुन्हे वार्ता

    कोर्टाच्या स्थगितीतील जमिनीवर नांगरणीचा प्रयत्न

    महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा आरोप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 25, 2026No Comments188 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसंत परिसरात जमीन वादातून धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायालयाने स्थगिती दिलेल्या वादग्रस्त जमिनीवर जबरदस्तीने शेती नांगरण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, यावेळी महिलांसह कुटुंबीयांना ट्रॅक्टरखाली चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

    माहितीनुसार, पिंपळगाव बसंत येथील अजय गोसावी यांच्या कुटुंबामध्ये जमीन वाद सुरू असून हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. संबंधित जमिनीवर न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेला असतानाही ऋषिकेश निखिल गोसावी, अभिषेक निनाद गोसावी आणि इतर काही जणांनी भाड्याने ट्रॅक्टर आणून जमीन नांगरण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    ही माहिती मिळाल्यानंतर अजय गोसावी, रश्मी अजय गोसावी आणि सुवर्णा सुभाष गोसावी हे घटनास्थळी गेले. त्यांनी ट्रॅक्टर चालकाला याबाबत विचारणा केली असता चालकाने थेट त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत रश्मी गोसावी आणि सुवर्णा गोसावी जखमी झाल्या असून त्यांच्यावर पिंपळगाव येथील राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

    दरम्यान, जखमी महिलांची प्रकृती गंभीर असतानाही पोलिसांनी आरोपींवर सौम्य स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून जमिनीवर जबरदस्तीने प्रवेश करण्यात आला, महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला, तरीही कठोर कारवाई करण्यात आली नसल्याने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा परिसरात सुरू असून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जखमी महिलांना न्याय मिळावा, संबंधितांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नासह कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif