Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»खून करण्याचा प्रयत्न; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    खून करण्याचा प्रयत्न; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 27, 2026Updated:April 27, 2026No Comments344 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    तालुक्यातील कुऱ्हाड तांडा परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत नातेवाईकांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात सात संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा या गावात रात्री दहा वाजेच्या सुमारास सुमित रूपचंद तंवर हे आपल्या घराबाहेर होते. यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून रणवीर ऊर्फ मणी सुरेश चव्हाण, सुमित अंकुश राठोड, आकाश शांताराम ठाकरे, दीपक मांगीलाल राठोड, आकाश राजू राठोड, गोपाळ ठाकरे आणि एक अनोळखी तरुण यांनी एकत्र येऊन फिर्यादी आणि त्यांचे चुलत भाऊ हिनेश इंद्रजित तंवर यांना घेरले.

    दरम्यान आरोपींनी तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत इंद्रजित तंवर यांच्यावर धारदार चाकूंनी हल्ला केला. त्यांच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif