Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!
    राष्ट्रीय

    होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!

    एक भारतीय खलाशी ठार : भारत सरकार सतर्क
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2026No Comments399 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    इराण आणि अमेरिका युद्धाला 2 महिने होऊनही या देशांमधील युद्ध काही थांबत नाहीये. या युद्धामुळे जग संकटात आहे. होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचे भयंकर संकट आहे. युद्ध थांबावे, ही जगाची इच्छा आहे. मात्र, अमेरिका आणि इराण दोन्ही देश मागे हटत नाहीत. त्यामध्येच अमेरिकेने होर्मुज खाडीत मोठी नाकेबंदी केली. अमेरिकेच्या या नाकेबंदीनंतर इराणी बंदराहून एकही जहाज बाहेर पडू शकत नाही.

    अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही अशा धक्कादायक पद्धतीने इराण उभा आहे. जास्तीत जास्त इराण अमेरिका युद्ध एक महिना चालेल असा अंदाज अमेरिकेचा होता आणि तिथेच अमेरिका चुकली. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला पण युद्ध काही थांबत नाही. या युद्धात एकही देश अमेरिकेच्या बाजूने उभा नाही. अमेरिकेलाही या युद्धाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे.

    होर्मुज खाडी अधिक धोकादायक बनली आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली तर दुसरीकडे अमेरिकेनेही नाकेबंदी केली. होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये पुन्हा एकदा क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले होत आहेत. एका चिनी जहाजावर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच भारतीय जहाजावरही मोठा हल्ला झाला. 18 खलाशी असलेल्या जहाजावर हल्ला करत त्याला समुद्रात बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    हा हल्ला नक्की इराणकडून करण्यात आला की, अमेरिकेकडून याबाबत अधिक माहिती मिळू शकत नाहीये. दोन्ही देश नेहमीप्रमाणे हातवर करत आहेत. मात्र, हा भारतासाठी मोठा दणका म्हणावा लागेल. अनेक भारतीय जहाज अजूनही होर्मुज खाडीत अडकून आहेत. आता थेट भारतीय जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यात 1 भारतीय खलाशी ठार झाला. या घटनेनंतर भारत सरकार अॅक्शन मोडवर आले.

    भारत सरकारमधील प्रमुख अधिकारी जहाज मालकाच्या संपर्कात आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेत मृत खलाशीचा मृतदेह सन्मानाने मायदेशी परत आणला जाईल, याकरिता भारत सरकारकडून प्रयत्न केली जात आहेत. भारत सरकार अॅक्शन मोडवर आहे. या हल्ल्याची जबाबदारी इराण किंवा अमेरिका यांच्याकडून घेण्यात आली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्ली हॉटेलच्या आगीत संपूर्ण कुटुंब उध्वस्त

    June 4, 2026

    ठरले! ‘या’ तारखेला कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन

    June 4, 2026

    राजधानी दिल्ली हादरली : हॉटेलमध्ये मृत्यूचे तांडव!

    June 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif