मुंबईत ‘पृथ्वी शॉ’ वर हल्ला..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आपल्या आवडत्या खेळाडू सोबत सेल्फी घेण्याचं मोह प्रत्येकाला असतो. पण हा मोह कधी कधी त्या खेळाडूच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. मुंबईत (Mumbai) ‘पृथ्वी शॉ’ (Prithvi Shaw) वर हल्ला झाला आहे. सुदैवाने पृथ्वी शॉ या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. पृथ्वी शॉ पूर्णपणे सुरक्षित आहे. पृथ्वी शॉ आपल्या मित्राच्या कारमध्ये बसला होता. त्यावेळी काही लोकांना पृथ्वी शॉ सोबत सेल्फी घ्यायचा होता. पृथ्वीसोबत सेल्फी घेण्यासाठी हे लोक त्याच्यामागे लागले होते. पण शॉ ने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यास नकार दिला. पृथ्वी शॉ चा नकार काही लोकांना सहन झाला नाही. ते पृथ्वीवर भडकले. त्यांनी पृथ्वी बसलेल्या कारवर दगडफेक सुरु केली. पृथ्वी शॉ च्या मित्राच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय बॅट्समन पृथ्वी शॉ मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. खेळापेक्षा इतर घटनांमुळे पृथ्वी शॉ जास्त चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी ‘व्हॅलेंटाइन्स डे’ ला त्याचा एडिट केलेला फोटो व्हायरल झाला होता. त्यावर शॉ समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं.

Leave A Reply

Your email address will not be published.