Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ब्रेकिंग»नांगरटीच्या वादातून मायलेकावर हल्ला
    ब्रेकिंग

    नांगरटीच्या वादातून मायलेकावर हल्ला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 30, 2026No Comments316 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    न्हावे शिवारातील घटना : सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

    चाळीसगाव – शेतातील नांगरटीच्या कारणावरून तालुक्यातील न्हावे येथे मायलेकास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    न्हावे शिवारातील पांडुरंग आगलावे यांच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी सुरू होती. यावेळी सागर जगताप यांनी गटाची सरकारी मोजणी झाल्यानुसार खुणा गाडण्यात आल्या असून त्याप्रमाणे नांगरटी करण्यास सांगितले. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. वाद वाढल्यानंतर पांडुरंग आगलावे यांच्यासह इतरांनी शिवीगाळ करत सागर जगताप यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, मुलाला वाचवण्यासाठी आलेल्या अलकाबाई जगताप यांनाही दांडका व विळ्याने मारहाण करण्यात आली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना 26 मे रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अलकाबाई महारू जगताप यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग आगलावे, महादू आगलावे, कृष्णा आगलावे आणि अन्य तीन महिलांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026

    ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif