जळगावात विसर्जनादरम्यान महापौरांच्या घरावर हल्ला, 43 जणांविरोधात गुन्हा

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यात किरकोळ अपवाद वगळता गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली असताना दुसरीकडे शहरात मात्र गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या घरावर हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे या भागात मोठा तणाव पाहायला मिळाला होता. महापौरांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी जळगाव शहरातील एम आय डी सी पोलिस ठाण्यात ४३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

जळगाव शहरात मेहरून परिसरात महापौर जयश्री महाजन यांचे निवासस्थान आहे, याच परिसरात स्थापन करण्यात आलेल्या एका गणपती मंडळाची मिरवणूक महापौर जयश्री महाजन यांच्या घरा समोरून जात असताना काही कार्यकर्त्यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर गुलाल फेकल्याच त्यांच्या परिवारात लक्षात येताच परिवारातील महिला सदस्यांनी गुलाल उधळण्यास विरोध केला होता. याच वेळी काही संतप्त कार्यकर्त्यांकडून महापौर महाजन यांच्या परिवारातील सदस्यांना मारहाण करण्यात आल्याचा आणि घरावर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप जयश्री महाजन यांनी केला.

महापौरांचा पोलिसांवर गंभीर आरोप
या घटनेत पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताकडे दुर्लक्ष केल्याने हा हल्ला झाला असल्याचं म्हटलं आहे. जर शहराच्या प्रथम नागरिकच या ठिकाणी सुरक्षित राहणार नसतील तर सर्व सामान्य जनतेचे काय असा सवाल ही जयश्री महाजन यांनी उपस्थित करून पोलिसांवर रोष व्यक्त केला आहे. या घटने संदर्भात एम आय डी सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

४३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

महापौरांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी जळगाव शहरातील एम आय डी सी पोलिस ठाण्यात ४३जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. गुलाल उधळण्याच्य्या कारणावरून काल मध्यरात्रीच्या सुमारास एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरात घुसून महिलांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा आणि घरावर दगडफेक केल्याचा आरोप महापौर जयश्री महाजन यांनी केला होते.

जळगाव शहरातील मेहरून भागात घडलेल्या या प्रकाराने महापौर जयश्री महाजन यांच्या घराच्या समोर मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता, घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनीही तातडीने मोठा बंदोबस्त वाढवत या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणली होती, रात्री उशिरा या परिसरातील गणेश मंडळाचे गणपती विसर्जन करण्यात आल्यानंतर जमाव पांगल्यानंतर तणाव ही कमी झाल्याचं पाहायला मिळाले होते. मात्र तरीही कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये या दंगली सह जीवे मारण्याचा प्रयत्न या घटनेत महापौर जयश्री महाजन यांच्या घरात घुसून हल्ला केल्या प्रकरणी पोलिसांनी ४३जणांच्या विरोधात दंगली सह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून यातील अठरा जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले, सध्या या परिसरात शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.