Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मुंबईत ATS ची कारवाई! ड्रग्ससह दोघांना अटक
    गुन्हे वार्ता

    मुंबईत ATS ची कारवाई! ड्रग्ससह दोघांना अटक

    तब्बल २ कोटी १७ लाख रुपयांचे कोकेन केले जप्त
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 12, 2026No Comments146 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे, मिरारोड आणि नालासोपारा येथे स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल २ कोटी १७ लाख रुपयांहून अधिक किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले असून, दोन नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने मोठे यश मिळवले आहे. या कारवायांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या एटीएसचे पथक नयानगर परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. यावेळी ईशा वाईन शॉपसमोर संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकावर पोलिसांची नजर गेली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून २६१.५ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत सुमारे ७८ लाख ४५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडे हे अमली पदार्थ कुठून आले याचा तपास सुरू आहे.

    दरम्यान, नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर परिसरात दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आणखी एक मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी हुसेन मार्क कॉपी (वय ३८) या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७९ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे १ कोटी ३९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

    प्राथमिक तपासात हुसेन मार्क कॉपी हा पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट देशाचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामागे मोठे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट कार्यरत आहे का? याचा एटीएस आणि पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या दोन्ही कारवायांमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील यंत्रणांची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif