flame broiler coupons jacksonville free iams cat food coupons kyoto royal oak coupons in bloom florist coupon code
Thursday, December 1, 2022

अत्याचारातून गतिमंद तरूणी गर्भवती; ॲट्रासीटीसह बलात्काराचा गुन्हा, आरोपीला अटक…

- Advertisement -

 

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

तरूणी गतीमंद असल्याचा गैरफायदा घेत झालेल्या अत्याचारातून सदर तरुणी तीन महिन्याची गर्भवती असल्याचा संतापजनक प्रकार पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली (खडकी) येथे उघडकीला आला आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून पाचोरा पोलिस ठाण्यात ॲट्रासीटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली (खडकी) येथील मागासवर्गीय समाजातील २२ वर्षीय गतिमंद तरूणी ही आपल्या वृध्द आईसोबत वास्तव्याला आहे. त्यांच्या गावात राहणारा ज्योतीराम पांडूरंग पाटील (२५) याने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मध्यरात्री तरूणीची आई झोपलेली असल्याचा गैरफायदा घेतल तिच्यावर अत्याचाराचा नित्यक्रम सुरू होता. वृद्ध महिलेच्या घराच्या बाजूला तिचे नातेवाईक राहतात. त्यांनी दोन महिन्यांपुर्वी ज्योतीराम पाटील दुष्कृत्य करतांना रंगेहात पकडले होते. याबाबत गावातील प्रतिष्ठीत नागरीकांकडून समज देण्यात आला होता.

पोळ्याच्या आदल्या दिवशी पिडीत तरूणी व तिची आई या दोघीजणी आजारी पडल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी पाचोरा तालुक्यातील गिरड येथील उपग्रामीण रूग्णालयात उपारार्थ दाखल केले. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. पिडीत मुलगी ही तीन महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान संशयित आरोपी ज्योतिराम पाटील याने सदरच्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास तुम्हाला जिवे ठार मारीन अशी धमकी देखील दिली होती. यासंदर्भात पिडीत तरूणीच्या नातेवाईकांनी गावातील पंचासमोर घटना कथन केल्यानंतर संशयित आरोपी ज्योतीराम पाटील याने सदरचा प्रकरणी घुमजाव केले. अखेर संशयित आरोपी ज्योतीराम पाटील याच्या विरोधात ॲट्रासीटी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपअधिक्षक भारत काकडे हे करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या