Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»उपचाराच्या नावाखाली अघोरी कृत्य आणि जादूटोणा
    गुन्हे वार्ता

    उपचाराच्या नावाखाली अघोरी कृत्य आणि जादूटोणा

    आणखी एका भोंदूबाबाचे खळबळजनक कारनामे उघड
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 16, 2026No Comments583 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात एकीकडे नाशिकमधील अशोक खरात प्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत आहेत. त्यानंतर आता मुंबईतही अशाप्रकारे भोंदूबाबा सक्रीय असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुंबईतील मालाड पूर्व परिसरात राहणाऱ्या एका भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. रिदम पांचाळ (वय ३७) असे या भोंदू बाबाचे नाव आहे. हा बाबा उपचाराच्या नावाखाली अघोरी कृत्य आणि जादूटोणा करून लोकांची दिशाभूल करायचा. त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, रिदम पांचाळ हा गेल्या दोन वर्षांपासून रविवार आणि गुरुवार या दिवशी स्वतःच्या अंगात देवी येत असल्याचा दावा करून अघोरी पूजा करत असे. भूत उतरवण्याच्या नावाखाली तो रात्री ६-७ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत अघोरी विधी करायचा. विशेष म्हणजे, ४ एप्रिल रोजी त्याने महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांच्या उपस्थितीत उघडपणे जादूटोण्याचा प्रयोग केला होता.

    हा भोंदू बाबा उपचारांच्या नावाखाली नागरिकांकडून अत्यंत संशयास्पद साहित्य मागवत असे. ज्यात बकऱ्याचे काळीज (कलेजा), स्मशानातील राख, लिंबू, टाचण्या, दारूची बाटली, सिगारेट, काळे आणि लाल कापड, कुंकू हे साहित्य मागवायचा. त्यानंतर ते चार रस्त्यांच्या मध्यभागी ठेवण्यास सांगून तो लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घ्यायचा, अशी माहिती समोर आली आहे.

    स्थानिक रहिवासी या भोंदू बाबाच्या कृत्यांमुळे त्रस्त झाले होते. साधारण ६५ ते ७० स्थानिकांनी एकत्र येत स्वाक्षरी केलेल्या तक्रारीसह अनेक फोटो आणि व्हिडीओ पुरावे म्हणून दिंडोशी पोलिसांकडे सादर केले. याप्रकरणी अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रिदम पांचाळला ताब्यात घेत त्याला अटक केली. आज दुपारी त्याला बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

    दरम्यान या भोंदू बाबाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण कोणताही जादूटोणा करत नसून, केवळ लोकांची सेवा आणि पूजा करत असल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच आपण यातून कोणताही आर्थिक मोबदला घेत नाही, असेही त्याने म्हटले. दरम्यान मुंबईसारख्या सुशिक्षित आणि प्रगत शहरात सुशिक्षित लोक अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. आता दिंडोशी पोलीस या प्रकरणात पुढील काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif