आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
आदर्श नगरातील इंदरलाल रामचंद्र कावना (वय-57) यांनी आजारपणाला कंटाळून मेहरूण तलावमध्ये उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील आदर्श नगरात इंदलाल कावना हे वास्तव्यास होते. गेल्या काही महिन्यांपासून ते शरीरिराच्या काही व्याधीमुळे त्रस्त होते. त्याच व्याधींना कंटाळून बुधवारी सायंकाळी कावना यांनी मेहरूण तलावमध्ये उडी घेवून आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्यातील चंद्रकांत पाटील, हेमंत कळसकर, नितीन पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह शोधण्यासाठी देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, यांच्यासह विनोद ठाकरे, रवींद्र हटकर, मुजाहिद शेख यांनी मेहरूण तलावमध्ये तासभर शोध मोहिम राबवून मृतदेह बाहेर काढला.

तलावातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शवविच्छेदमदतही जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. यावेळी नातेवाईकांची मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. याप्रकरणी  एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.