सुसरी येथे वृद्धाची आजाराला कंटाळून आत्महत्या

0

लोकशाही न्युज नेटवर्क
भुसावळ तालुक्यातील सुसरी गावातील एका वृद्धाने आजाराला व पतसंस्थेच्या कर्जला कंटाळून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली

तालुक्यातील सुसरी गावातील रहिवाशी मुरलीधर रामु पाटील ( ७५ ) हे गेली कित्येक दिवसा पासून मुतखडा या आजारा पासून त्रस्त होते व पंतसंस्थेच्या कर्जाला कंटाळून सोमवारच्या रात्री आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार रोजी सकळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांची नात त्यांना चहा देण्यासाठी गेली असता उघडकीस आली

या बाबत त्यांचा मुलगा सुनिल मुरलीधर पाटील याच्या खबरीनुसार वरणगाव पोलीसांत अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मधुकर भालशकर हे करीत आहे

मुलगा व वडीलाची एकाच ठिकाणी आत्महत्या

मागील काही वर्षा पुर्वी मयत मुरलीधर पाटील यांच्या मुलानेही अशीच ज्या घरातील छताच्या लाकडाला गळफास लावून जिवन यात्रा संपवीली होती त्याच ठिकाणी व त्याच लाकडाला दोरी बांधून गळफास लावून घेतला !

Leave A Reply

Your email address will not be published.