शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील कुसूंबा येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सोमवारी २० मार्च रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. (३५, रा. कुसूंबा) असे मृत दीपक संतोष पाटील (३५, रा. कुसूंबा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

दीपक पाटील हे मुळचे अमळनेर तालुक्यातील झाडी येथील रहिवासी आहेत. गावात त्यांची शेती असून शेती करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीसाठी त्यांनी सोसायटीतून कर्ज घेतले होते. पण, निसर्गाचा लहरीपणा आणि हवेतसे उत्पादन नाही, त्यात कर्जाचे डोंगर म्हणून काही वर्षांपूर्वी पाटील हे कुटूंबासह कुसूंबा येथे राहण्यास आले होते. नंतर शेती कामासोबत एमआयडीसी कंपनीत ते हाजमजुरीचे काम करत होते.

शनिवारी १९ मार्च रोजी दीपक यांच्या पत्नी मुलांसह माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे घरी दीपक व त्यांच्या आईच होत्या. रविवारी २० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांनी आईला दुकानात काही तरी वस्तू घेण्यास पाठविले. आई दुकानावर गेली तेवढ्यात त्यांनी पॅन्टच्या सहाय्याने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रात्री ८ वाजेच्या सुमारास आई दुकानावरून घरी परतल्यावर त्यांना मुलगा हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी आक्रोश केला. दीपक पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दि. २० मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.