तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; जळगाव शहरातील घटनेने खळबळ

0

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; जळगाव शहरातील घटनेने खळबळ

जळगाव : मेस्कोमाता नगर परिसरातील पंकज देविदास बिढे (वय २९) या तरुणाने घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. पंकज यावेळी घरी एकटेच होते, तर त्यांची आई आणि पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.

त्या दोघी परत घरी आल्यावर दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता पंकज यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तातडीने घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवला.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.