Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांमुळे २० व २१ डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद
    ताज्या बातम्या

    नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांमुळे २० व २१ डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 19, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांमुळे २० व २१ डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद

    जळगाव: राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार नगर परिषद/नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५ चा कार्यक्रम जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता सुरु आहे. आयोगाच्या आदेशान्वये न्यायालयीन अपील व अन्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या प्रभागांतील जागांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

    त्यानुसार भुसावळ, अमळनेर, पाचोरा, सावदा, यावल व वरणगाव येथे दि. २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी भुसावळ, भडगाव, चाळिसगाव, अमळनेर, पाचोरा, सावदा, यावल, वरणगाव, फैजपूर, रावेर, चोपडा, जामनेर, एरंडोल, पारोळा, धरणगाव, नाशिराबाद या १६ नगर परिषदांमध्ये तसेच मुक्ताईनगर व शेंदुर्णी या २ नगर पंचायतींमध्ये मतमोजणी होणार आहे.

    मतदान व मतमोजणीच्या दिवशी आठवडे बाजारामुळे मोठी गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हादंडाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी मुंबई मार्केट अँड फेअर्स अ‍ॅक्ट १८६२ चे कलम ५ (अ) व (क) अन्वये प्राप्त अधिकार वापरून दि. २० डिसेंबर २०२५ (मतदान दिवस) व दि. २१ डिसेंबर २०२५ (मतमोजणी दिवस) रोजी नगर पालिका हद्दीतील भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

    तसेच नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्याबाबत निर्देश श्री घुगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif