जळगाव | प्रतिनिधी
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.सी.ई.सोसायटी चे संचालक डी.टी.पाटील होते
या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे पी.टी.शिक्षक सुनिल बावस्कर यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच *२१जून च योग दिवस* म्हणून का साजरा केला जातो याचेही मुलांना विवेचन केले. तसेच इयत्ता 5 ते 7 वीच्या विद्यार्थ्यासाठी सूर्यनमस्कार आसन स्पर्धा घेण्यात आली यात प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली तसेच इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी योगासने, प्राणायाम यांची प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे , सतिश भोळे, माधुरी भंगाळे, इ.पी.पाचपांडे, पूनम कोल्हे, वर्षा राणे, व्ही.एस गडदे, ए.एन.पाटील, एम.एस नेमाडे, तुषार पाटील आदी शिक्षक उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post