Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण
    गुन्हे वार्ता

    महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण

    केबिनमधील थरार : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 22, 2026No Comments443 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    महावितरण कंपनीच्या टेंडरची गोपनीय माहिती देण्यास नकार दिल्याने सहाय्यक अभियंत्याला त्यांच्याच केबिनमध्ये शिरून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    संदीपकुमार रणछोड बडगुजर (वय 57, रा. लेक रेसिडेन्सी, मेहरूण) हे जळगाव विभागातील महावितरण कंपनीच्या दीक्षितवाडी येथील कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. सोमवार दि. 20 एप्रिल रोजी दुपारी 12:00 ते 12:18 वाजेच्या सुमारास बडगुजर हे आपल्या केबिनमध्ये शासकीय कामकाज करत होते. यावेळी संशयित आरोपी संजय रामभाऊ वराडे (रा. चिंचोली, ता. जळगाव) हा त्यांच्या केबिनमध्ये शिरला. त्याने बडगुजर यांच्याकडे एमएसईबीच्या टेंडर संदर्भात काही गोपनीय माहिती मागितली. मात्र, ही माहिती देणे नियमात नसल्याने बडगुजर यांनी नकार दिला.

    दरम्यान माहिती देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या संजय वराडे याने त्यांच्याशी अरेरावी करण्यास सुरुवात केली. संजय वराडे याने रागाच्या भरात अभियंता संदीपकुमार बडगुजर यांच्या शर्टची कॉलर ओढून त्यांचा शर्ट फाडला आणि बटणे तोडली. इतक्यावरच न थांबता त्याने त्यांना चापटबुयांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच केबिनमधील शासकीय फाईल्स अस्ताव्यस्त फेकून देऊन गोंधळ घातला. तुम्ही माझ्या बोटातील सोन्याची अंगठी काढली, अशी खोटी तक्रार मी तुमच्याविरुद्ध देईन, अशी धमकीही त्याने यावेळी दिली.

    या घटनेनंतर संदीपकुमार बडगुजर यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी संजय वराडे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भांडारकर हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शासकीय कार्यालयात अधिकाऱ्याला झालेल्या या मारहाणीमुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif