Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदारीचं वाटप
    राजकारण

    उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदारीचं वाटप

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 11, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्रात पुढच्या तीन-चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची आहे. मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून या निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं असतं.

    यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या मनसेसाठी प्रतिष्ठेची आहे. दोन्ही ठाकरे बंधुंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. कारण दोन्ही ठाकरेंचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटल्याच विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालं होतं. आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने विशेष रणनिती आखली आहे.

    आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुंबईतील उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून महानगर पालिकेच्या तयारीला आधीपासूनच सुरवात झाली आहे. यानंतर मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे गटाकडून मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदारीचं वाटप करण्यात आलं आहे. उपनेत्यांनी मतदार संघात जाऊन आढावा बैठका, माजी नगरसेवक, शाखा प्रमुख इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे. काल राज्य सरकारच्या वतीने प्रभागासंदर्भात शासन निर्णय काढला असून ठाकरे गटाच्या वतीने पालिकेची तयारी केली जात आहे. मुंबई महापालिकेत एकूण 227 वॉर्ड आहेत.

    विधानसभानिहाय उपनेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

    1. अमोल कीर्तीकर – दहिसर, बोरिवली, मागाठाणे
    2. उद्धव कदम – चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम
    3. विलास पोतनीस – दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व
    4. विश्वासराव नेरूरकर – वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम
    5. रवींद्र मिर्लेकर – विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम
    6. गुरुनाथ खोत -, चांदिवली, कलीना, कुर्ला
    7. नितीन नांदगावकर – विक्रोळी, भांडुप, मुलुंड
    8. सुबोध आचार्य – घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर – मानखुर्द
    9. मनोज जमसूतकर – अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा
    10. अरुण दूधवडकर – धारावी, माहीम, वडाळा
    11. अशोक धात्रक – वरळी, दादर, शिवडी
    12. सचिन अहिर – मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी

    गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाच्या असतात. कारण या निवडणुका म्हणजे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो. कार्यकर्ते घडवण्याबरोबर पक्षाची संघटनात्मक बांधणी भक्कम करता येते. म्हणून या निवडणुका सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #BMC #politics #मुंबई #राजकारण assembly distribution Mumbai mumbai manapa responsibilities Thakare Group
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif