Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा श्रमण संघ अध्यक्षपदी अशोक जैन
    जळगाव

    जळगाव जिल्हा श्रमण संघ अध्यक्षपदी अशोक जैन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 14, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव जिल्हा श्रमण संघ अध्यक्षपदी अशोक जैन

    जिल्हास्तरीय ‘श्रमण संघ’ अधिवेशन संपन्न

    जळगाव (प्रतिनिधी) – श्रमण संघीय उपाध्याय प्रवर प.पू.प्रवीण ऋषीजी म.सा. होळी चातुर्मासानिमित्त जळगावत उपस्थित आहेत. त्यांच्या सान्निध्यात शहरातील स्वाध्याय भवन येथे श्रमण संघाचे जळगाव जिल्हास्तरीय अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनासाठी जळगाव शहरातील, परिसरातील, भुसावळ, जामनेर, पहूर, चाळीसगाव, शेंदुर्णी, बोदवड, नशिराबाद, धरणगाव, पाचोरा येथून सुश्रावक-सुश्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    आचार्य आनंदऋषीजी महाराज साहेब यांनी श्रमण संघाच्या आणि एकुणच सर्व मान्यता, परंपरा यांना एका मंचावर आणण्यासाठी तसेच धर्मोन्नतीसाठी आयुष्य वेचले. ‘जैन आगम’, ‘जैन दर्शन’ लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविले. त्यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या मोठ्या आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या ‘श्रमण संघ’ या परंपरेचे सदस्य असल्याचा आम्हास गौरव असला पाहिजे, महाराज साहेब आपल्या प्रवचनात बोलत होते. जळगाव श्री संघाचा व वर्षीतप पारणा व्यवस्थेचा गौरव करण्यात आला.

    अधिवेशनाचे प्रास्ताविक अशोक जैन यांनी केले. संघ एकतेसाठी चर्चा होऊन ठराव पारीत करण्यात आले. जळगाव जिल्ह्याच्या श्रमण संघ अध्यक्षपदी जैन इरीगेशनचे चेअरमन अशोक भवरलाल जैन यांच्या नावाचा ठराव सर्वानुमते पारीत करण्यात येऊन तशी घोषणा आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री, संघाचे ज्येष्ठ आधारस्तंभ सुरेशदादा जैन यांनी केले. आपल्या आशीर्वादपर भावना संघपती दलुभाऊ जैन यांनी व्यक्त केल्या. पुण्याहून आनंद तीर्थचे अध्यक्ष सतीश सुराणा, सुभाष मुथा यांनी चिचोंडी-अहिल्यानगर येथे साकारत असलेल्या ‘आनंदतीर्थ’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. “गुरु आनंद दीक्षा मंत्र” प्रदान करण्यात आला. गुरु आनंद यांची प्रतिमा कोठारी परिवारातर्फे देण्यात आली. सूत्रसंचालन सीए अनिल कोठारी यांनी केले तर आभार सुरेंद्र नथमल लुंकड यांनी मानले.

    गौतम प्रसादी भोजन व्यवस्था, भवरलाल आणि कांताबाई जैन परिवारातर्फे करण्यात आले.

     

    Ashok Jain jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif