Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात
    ताज्या बातम्या

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 8, 2026No Comments141 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव: जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १६० जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योग च्या भव्य दालनात आंबा प्रदर्शन ‘मॅंगो फिएस्टा’ चे ७ मे रोजी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फित सोडून औपचारिक उद्घाटन झाले.

    याप्रसंगी दिल्ली येथील इंडियन पोटॅश लिमिटेडचे जनरल मॅनेजर यू. एन. सिंग, स्वरुप लुंकड, आंतरराष्ट्रीय आंबा तज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुंजाटे, अतुल जैन, सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, अंबिका जैन, अन्मय जैन, जैन परिवारातील सदस्य, त्याच प्रमाणे डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, डॉ. के.बी. पाटील, डॉ. निर्मल बाबू, बी.डी. जडे, शंकर गाडेकर, नितीन पाटील, अजय काळे यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते. प्रथम अशोक जैन व ज्योती जैन यांच्याहस्ते आंबावृक्षाचे विधिवत पूजन करण्यात आले.

    हे ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शन आज ०८ व ०९ मे पर्यंत सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या शेती संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रातर्फे आंब्या वरील सुरू असलेले संशोधन कार्य अधोरेखित करणाऱ्या ह्या प्रदर्शनात भारतासह विदेशातील १६० हून अधिक नामांकित प्रजातीच्या आंबाच्या जाती आहेत. जैन इरिगेशनद्वारा विकसीत केल्या टिश्यूकल्चरच्या १३ प्रजाती, जैन संकरित (हायब्रीड) आंब्याच्या ४९ प्रजाती आणि थायलँड, मेस्किको, युरोप, युएसए, ऑस्ट्रलिया, जपान, ब्राझील, इस्त्राईल या विदेशी आंब्याच्या वेगवेगळ्या जातींचे आंबे पाहण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली आहे. विेशेष म्हणजे जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून प्रसिद्ध असलेला मियाझाकि आंब्याला देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘मँगो फिएस्टा-२०२६’ या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif