Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अध्यात्म»अशक्य ही शक्य करतील स्वामी!
    अध्यात्म

    अशक्य ही शक्य करतील स्वामी!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 25, 2026No Comments145 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही विशेष लेख 

    श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोटचे स्वामी यांचा 20 मार्च 2026 चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी प्रकट दिन साजरा झाला. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती याच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत. स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथील कर्दळीवनातून प्रकट झाले. त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले. 1856ते 1878 या काळात त्यांनी अक्कलकोट येथे लीला चरित्र केले. त्यांच्या प्रकट दिनाच्या पवित्र व मंगल दिनानिमित्त त्यांच्या तारक मंत्रातील काही भागाचे अल्पसे चिंतन त्यांच्याच चरणावर माथा ठेवून आपण करणार आहोत…

    अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, एक ब्रम्हांडनायक!त्यांची स्तुती करणे किंवा त्यांचा महिमा गाणे या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड आहेत कारण स्वामीजी अतर्क्य व अवधूत वृत्तीचे आहेत. त्यांच्या सर्वच गोष्टी तर्काच्या पलीकडच्या आहेत. त्यांच्या प्रकटन काला विषयी दोन प्रतिपादने आहेत आणि अधिकारी व्यक्तींकडून ते सांगितले गेले आहेत. त्यात पहिले म्हणजे १०५६ मध्ये हरियाणा राज्यात छेली या ग्रामी आठ वर्षाच्या बाल रूपाने वटवृक्षाखाली त्यांचे प्रकटन झाले. दुसरे म्हणजे मी नृसिंह भान असून श्रीशैल येथील कर्दळीवनातून आलो आहे असे स्वतः स्वामींनी सुचवले म्हणजे एकूण त्यांचा कार्याचा ज्ञातकाळ 800 वर्ष इतका आहे.

    त्यांचे अनेक अविष्कार झाले, नाना नावांनी ते संबोधले गेले, नाना स्थळी त्यांच्या लीला झाल्या पण अक्कलकोट येथे त्यांनी 22 वर्ष वास्तव्य केले म्हणून त्यांना ‘अक्कलकोट स्वामी’ असे म्हणतात. त्यांचे व्यक्तिमत्व प्रखर व तेजस्वी होते. ते सात फूट आठ इंच एवढे उंच होते. अजान बाहु होते, इतके दिव्य तेज होते कोणीही त्यांच्याकडे पाहू शकत नसे. हैदराबादी हिंदी बोलण्याची त्यांची ढब होती. कडकपणा व प्रेमळपणा हे दोन्ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” या त्यांच्या अभिवचनाने त्यांनी असंख्य भाविकांना अश्वस्थ केले. ती त्यांची भूमिका होती, प्रेरणा होती. यातच त्यांचे तेजस्वी संतत्व सामावलेले आहे. 1878 मध्ये त्यांनी त्यांचे अवतार कार्य अक्कलकोट येथील संपवले नंतर त्यांनी रामचंद्र बिडकर नावाच्या त्यांच्या संत शिष्याला, “अभी हम गया नही हम जिंदा है” असे सांगितले आणि हे त्यांचे सर्वात मोठे विशेष आहे की ते ‘स्मरणगामी’ आहेत. या त्यांच्या स्वरूपामुळे आजही ते भाविकांच्या हाकेला ओ देतात, त्यांचा सांभाळ करतात हे सांगणे न लगे.

    “अशक्य ही शक्य करतील स्वामी”, या अक्कलकोट स्वामी यांच्या तारक मंत्रातील ओळी आज असंख्य भाविकांच्या हृदयात घर करून राहिलेल्या आहेत. नित्यसेवेच्या, नित्य पूजेच्या त्या एक अविभाज्य भाग आहेत. हा पवित्र तारक मंत्र अतिशय आत्मीयतेने श्रद्धेने व समर्पण भावाने म्हटला गेला तर फार मोठी शक्ती व प्रचिती दोन्ही देणारा आहे. फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तिर्‍हाईत पणाचा नको.

    ‘माझे स्वामी माझे तारणहार आहेत’ या भावाने तो सेवेत आला पाहिजे. संसार हा अलबेला आहे. कधी सुखाचे तर कधी दुःखाचे प्रसंग येतात व जातात. पाठीशी स्वामी असतात किंवा त्यांनी एक हात धरलेला असतो तेव्हा सहजच निर्भयता प्राप्त होते. तारक मंत्रातील पहिलीच ओळ आहे ‘निशंक हो मना’ म्हणजे मनात तू संशय धरू नको, विकल्प आणू नको. स्वामीजी पुढे आहेत का मागे आहेत हा प्रश्न पडू देऊ नको ते तुझ्या हृदयातच आहेत. फक्त तारक मंत्राच्या शेवटच्या कडव्यात स्वामींनी जे पंचामृत सांगितले आहे किंवा जी पंचसूत्री त्यांना अभिप्रेत आहेत ती त्यांचे पंचप्राण आहे. त्याचे प्रामाणिकपणे व प्रयत्नपूर्वक आचरण झाले तर प्रचिती आल्याशिवाय राहणारच नाही ती सूत्र आपण पाहू.

    प्रथम सूत्र विभूती, म्हणजे अंगारा किंवा भस्म. अभिमंत्रित केलेल जल व कपाळाला लावलेला अंगारा किंवा भस्म याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा. विभूतीचा दुसरा अर्थ वैराग्य किंवा विरक्ती. एकापाठोपाठ एक, ऐहिक गोष्टी मागू नकोस तिथे काहीतरी विराग हवा आणि ईश्वराविषयी प्रेम, अनुकंपा, अनुराग वाटायला हवा तर ती खरी स्वामीकृपा. हरवलेली वस्तू सापडणे किंवा एखादी गोष्ट मनासारखी होणे एवढा स्वामीकृपेचा आवाका नाही.

    दुसरे सूत्र नमन, देवाच्या चरणावर डोकं ठेवलं की एक क्षणतरी ‘मन’ नाही अशी अवस्था झाली पाहिजे. तसेच 24 तास हात जोडून आपण नमस्कार करू शकत नाही तर शरणागतीचा हा भाव आपल्या जीवनाला व्यापून राहिला पाहिजे. मनात अखंड धारणा हवी की, तो कर्ता करविता आहे.

    तिसरे सूत्र नाम, श्वासावर घ्या किंवा हातात माळ घेऊन घ्या पण ते सप्रेम घेतले पाहिजे. अतिशय हळुवार अंत:करण, प्रसन्न मन व निश्चयाने एका विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी बसून केवळ आपल्यासाठी नाम घेतले पाहिजे. ध्रुव बाळ तसेच प्रल्हाद बाळ यांच्या कथा आपण ऐकल्या आहेत. तसा दृढनिश्चय थोडा तरी हवा. तसेच शिवाय उठता बसता, खाता पिता, झोपताना नामस्मरण अवश्य करावे. नामस्मरण हा काही शो नाही, ते प्रदर्शन नाही, ते आपल्या उद्धारासाठीचे साधन आहे. या भावानं नाम घेणे अभिप्रेत आहे.

    चौथे सूत्र ध्यान, किमान अर्धा तास तरी ध्यान हवे. कारण भगवत गीतेत वचनच आहे, मी तुझ्या हृदयातच आहे त्यामुळे परमेश्वर भेटला, देव भेटला असे बाह्य जगात संभवत नाही. चारीधाम यात्रा अवश्य करावी. स्थान महात्म्य, तीर्थ महात्म्य निश्चित असते पण परमेश्वर भेटायचं असेल, भगवंत तर आतच त्याला शोधले पाहिजे. त्यासाठी ‘ध्यान’ हे साधन महत्त्वाचे आहे. “भगवंत आपल्या हृदयात चैतन्य रूपाने तो आहे व इतरांच्या हृदयातही तो तसाच आहे” हे ज्ञान हळूहळू होणे म्हणजे स्वामीकृपा.

    पाचवं सूत्र तीर्थ, मंत्राने अभिमंत्रित केलेले जल हे तीर्थ ठरते. त्याची पवित्रता व सामर्थ्य आज ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे आणि तीर्थाचा अर्थ पवित्र कर्म. चांगली कर्म असतील तर स्वामी पाठीशी उभे राहतात अन्यथा नाही. भूतकाळ आपल्या हातात नाही. पण वर्तमान काळात तरी काया-वाचा- मन या तिन्ही मार्फत कर्म पवित्र झाली पाहिजेत.

    या पंचसूत्री चे पालन प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला तर श्री स्वामी समर्थ निश्चित प्रसन्न होतील, आपल्या पाठीशी निश्चित असतील व त्या बळावर आपण निर्भयपणे जीवन क्रमणा करू.

    भाग्यरेखा पाटोळे
    कोथरूड, पुणे. 
    मो. 8412926269

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण

    November 8, 2026

    दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!

    November 6, 2026

    होमिओपॅथी की मॉडर्न मेडिसिन? भाग २

    October 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif