आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर पोलिसांचे पथसंचलन…

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

वरणगाव शहरात आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर पोलीस पथक व गृहरक्षक दलाच्या जवानांनी शहरात पथ संचलन केले. आज आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी साजरे होणार असल्याने, शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कोणत्या एका धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची खबरदारी म्हणून वरणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांसह पथ संचलन करण्यात आले.

सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन पासून संचलनाला सुरुवात होऊन शहरातील मुख्य मिरवणुकीच्या मार्गावर व नंतर पोलीस स्टेशनला पंथ संचलनाची सांगता करण्यात आली. संचलनाचे नेतृत्व सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुड आणि उप सह पो.निरिक्षक परशुराम दळवी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.