आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तक यांचे काम कौतुकास्पद – सौ.मनिषा बांगर

0

स्पर्धेत व उकृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तक यांच्या गौरव

मनवेल ता.यावल : लोकशाही न्युज नेटवर्क

ग्रामीण भागात आशा स्वयंमसेविका व गटप्रवर्तक यांचे काम कौतुकास्पद असून रात्री- बेरात्री केव्हाही फोन केल्यास गरोदर मातेच्या प्रसुती करीता सज्ज राहत असून त्याच्या कार्यने बाल मृत्यू व माता मृत्यूचे प्रमाणात कमी झाले आहे , त्याच्या कार्यचे कौतुक यावल पंचायत समितीत आयोजित आशा डे च्या कार्यक्रमात करण्यात आला.

आशा डे निम्मत विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.च्या माता बाल संगोपन अधिकारी श्रीमती डॉ मनिषा बांगर होत्या. जि.प.समुह संघटक प्रविण जगताप समूह ,तालुका वैद्ययातील अधीकारी मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आशा डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन करुण करण्यात आली . तालुका समुह संघटक श्रीमती प्रतिभा ठाकुर यांनी विविध स्पर्धाचे नियोजन केले होते त्यात सकाळी नऊ वाजे पासून विविध स्पर्धा घेण्यात आल्या यात संगीत खुर्ची निंबु चंपा अध्दश्रद्धा निर्मुलनावर नाटीका सह विविध कार्यक्रम घेण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.