Wednesday, September 28, 2022

खळबळजनक ! आसाराम बापूच्या आश्रमात सापडला मुलीचा मृतदेह

- Advertisement -

गोंडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

उत्तर प्रदेशातील गोंडा येथील आसाराम बापूच्या आश्रमात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आसारामच्या आश्रमात पार्क केलेल्या कारमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला.

- Advertisement -

- Advertisement -

मृत मुलीचं वय साधारणतः १३ ते १४ असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ माजली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. ही मुलगी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

विमौर परिसरात असलेल्या आश्रमात ही घटना घडली आहे. मुलगी ५ एप्रिलपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह चार दिवसांनी आढळला आहे. आश्रमातील एका कारमध्ये तिचा मृतदेह आढळला. कारमधून दुर्गंधी येत असल्याने तेथील व्यक्तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्रमाचे सुरक्षारक्षकाने कार उघडून बघितली. त्यावेळी आतमध्ये मुलीचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलीस आणि फॉरेन्सिक पथक आश्रमात पोहोचले.

आसारामच्या आश्रमात मृतदेह सापडल्याची ही घटना पहिलीच नाही. यापूर्वीही अशा घटना उघड झाल्या होत्या. सन २००८ मध्ये गुजरातमध्ये आसारामच्या आश्रमातून दोन जण बेपत्ता झाले होते. त्यानंतर ५ जुलै रोजी त्यांचे मृतदेह साबरमती नदीच्या काठावर आढळले होते. गुजरातनंतर मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील गुरुकुल आश्रमातही एका मुलाच्या मृत्यूची घटना समोर आली होती. ही घटना २००८ मध्येच घडली होती. आश्रमातील शौचालयात मुलाचा मृतदेह आढळला होता. बाथरूममध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता, असे त्यावेळी सांगितले होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या