ओवैसींना आणखी एक झटका; 30 कार्यकर्त्यांना अटक

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिल्लीत निदर्शने आणि घोषणाबाजी केल्यामुळे एमआयएमच्या  30 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. भडकाऊ वक्तव्ये आणि सोशल मीडियावर द्वेषयुक्त संदेश पसरवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर पक्षाला आता आणखी एक धक्का बसलाय. गुरुवारी नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशनबाहेर  निदर्शनं आणि घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी 30 कार्यकर्त्यांना अटक केलीय.

पोलिसांनी आयपीसी (IPC) 186/188/353/332/147/149/34 कलमान्वये अटक केलीय. आयपीसीचं हे कलम अधिकृत कामात अडथळा आणणं, दंगल किंवा हिंसाचार घडवण्यासाठी जमावात सामील होणं आणि गुन्हेगारी कृत्यासाठी एकत्र येणं यासंबंधी आहे. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ हे कार्यकर्ते पोलिस ठाण्याबाहेर जमले आणि त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. दरम्यान, ओवेसींविरोधातील एफआयआरचं प्रकरणही समोर आलंय. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटनं काल असदुद्दीन ओवैसी आणि स्वामी यती नरसिंहानंद यांच्याविरुद्ध प्रक्षोभक भाषणं दिल्याबद्दल एफआयआर नोंदवलाय. यापूर्वी, दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटनं नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यासह 9 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. यामध्ये शादाब चौहान, सबा नक्वी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुल रहमान, गुलजार अन्सारी, अनिल कुमार मीना आणि पूजा शकुन यांचा समावेश आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.