केजरीवालांच्या पराभवाची मोठी कारणे !

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीपासूनच अरविंद केजरीवाल दिल्लीत सत्तेत होते. मात्र आजच्या निकालांमध्ये ‘आप’च्या मनसुब्यांना सुरुंग लागल्याचे चित्र आहे. कारण मतमोजणीतील सुरुवातीचे कल लक्षात घेता, भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे, तर आम आदमी पक्ष विजयाची हॅट्ट्रिक मारण्यास अपयशी ठरला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पदरी आलेल्या पराभवाची कारणे समजून घेवू या!

* तत्कालीन मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यासारख्या बड्या चेहऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरुंगवास भोगावा लागला. आपचे एकूण 16 नेते या काळात तुरुंगवारी करुन आले.

 

* मद्य घोटाळ्यामुळे आम आदमी पक्षाची प्रतिमा सर्वसामान्य जनतेमध्ये मलीन झाली. सुरुवातीच्या कलांमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री अतिशी, अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया हे तिन्ही बडे चेहरे पिछाडीवर राहिले. केजरीवालांनी नंतर मुसंडी मारली, तरी त्यांची आघाडी घटल्यामुळे लोकप्रियता ओसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अतिशी मुख्यमंत्रिपदावर असतानाही पराभवाच्या छायेत जाणे धक्कादायक ठरले.

 

* दिल्लीचे वाढते प्रदूषण, बेरोजगारी, गुन्हेगारी यासारख्या समस्यांवर अंकुश ठेवण्यात आम आदमी पक्षाला आलेले अपयश.

 

* यमुना नदीच्या पाण्यात विष कालवल्याचा आरोप केजरीवालांनी केल्यामुळे टीका झाली, तो अत्यंत बाळबोध असल्याचेही बोलले गेले.

 

* सत्तेसाठी काहीही करु शकतात, अशी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा निर्माण करण्यात भाजपला यश.

 

* फ्रीबीज्‌ अर्थात ‘मोफत रेवड्यां’च्या आमिष दाखवल्यामुळे करदाते अधिकचा भार पडण्याच्या भीतीने धास्तावले, घोषणा अंमलात येऊनही विकास दर मात्र मंदावला.

 

* राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संघर्षाचा दिल्लीवासियांना आलेला उबग.

 

* आम आदमी पक्षाच्या सात आमदारांनी मतदानाच्या तोंडावर पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी ही निर्णायक ठरली.

 

* शीशमहल या निवासस्थानामुळे अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी’ अशा प्रतिमेला तडा गेला.

 

* भारतीय जनता पक्षाने प्रचारात घेतलेली आघाडी, तळागाळात पोहोचून केलेला प्रचारही आपच्या विरोधात गेला.

Leave A Reply

Your email address will not be published.