विनयभंग करणाऱ्यास अटक करा

भटक्या वंचित महिला संघटनेचे निवेदन

0

 

वरणगाव, लोकशाही  न्यूज नेटवर्क

शहरातील एका व्यापाऱ्याने त्याच्याच मॉलमध्ये कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र संशयीत अध्याप मोकाट असल्याने भटके विमुक्त बहुजन वंचित महिला संघटना व रिपाई (आठवले गट) यांनी पोलीसांना निवेदन देत विनयभंग करण्यास त्वरीत अटक केलेची मागणी केली आहे.

शहरातील एका नामाकीत मॉलचे संचलाकाने मॉलमध्येच कामावर असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा दि ११ सोमवारच्या रात्री विनंयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मॉल संचालक राजेंद्र जैन याच्या विरोधात वरणगाव पोलीस स्टेशनला पोस्को अर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला असून आध्यपही मॉल संचालकावर पोलीसांन कडून कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही.

दरम्यान याविरोधात शहरातील भटके विमुक्त बहुजन वंचित महिला सघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व रिपाई (आठवले गट) यांच्या पदाधिकाऱ्यांनी सह पो निरिक्षक जर्नाधन खंडेराव यांना निवेदन देऊन मॉल संचालकास अटक करून कारवाही करण्याची मागणी केली आहे त्याच्यावर कारवाही न झाल्यास आदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर अनिता पवार, सोनिया लोंढे, सुनीता भुसाडे, नलिनी जाधव, सिता गायकवाड, दिपाली भुसाडे, संजय तायडे, अनिल सुरवाडे, प्रकाश सुरवाडे, भोला इंगळे, विजय सुरवाडे आदीच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.