Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अटलांटा प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा!
    ताज्या बातम्या

    अटलांटा प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 5, 2026No Comments157 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नगरसेवकांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

    जळगाव : शहरातील कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी प्रकरण आता अधिकच गंभीर बनले आहे. या प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यापूर्वीच तात्काळ अटक करण्यात यावी अशी ठाम मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
    या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, जळगाव महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असून यापूर्वीच शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कंपनीच्या संचालकांसह इतरांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
    नगरसेवक देशमुख यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, या प्रकरणातील आरोपी अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती मिळत आहे. जर त्यांना जामीन मिळाला, तर ते तपासात अडथळा निर्माण करू शकतात, तसेच पुरावे नष्ट करण्याचा किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तपासाची दिशा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जळगावकरांच्या करातून जमा झालेल्या पैशांचा प्रश्न असल्याने या प्रकरणात कठोर आणि तातडीची कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे, असे देशमुख यांनी ठामपणे सांगितले. आरोपींना त्वरित अटक करून तपास वेगाने आणि प्रभावीपणे पुढे न्यावा, तसेच जनतेचे कोट्यवधी रुपये वसूल करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
    या प्रकरणात महापालिका प्रशासनाकडूनही अधिकृत फिर्याद नोंदवण्यात आली असल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले असून पुढील कारवाई काय होते, याबाबत उत्सुकता वाढली आहे. यावेळी स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, विजय जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच तपास यंत्रणेला आवश्यक ती सर्व मदत करण्यास आपण तयार असून जनहितासाठी हा लढा पुढेही सुरूच राहील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif