Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»‘मास्क घातलेल्या लोकांना अटक करा’
    राजकारण

    ‘मास्क घातलेल्या लोकांना अटक करा’

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 9, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्क घालणाऱ्या लोकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणा जाळपोळ आणि हिसाचार झाल्याचेही समोर आले आहे. यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे हे आदेश दिले आहेत.

    डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी राज्य सरकारच्या नियमांना न जुमानता, लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर २००० सैनिक (नॅशनल गार्ड) तैनात करण्याचा आदेश जारी केला.ट्रम्प सरकारच्या या निर्णयाचा लॉस एंजेलिसच्या नागरिकांकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे लोकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. यावेळी काही आंदोलक हे मास्क घातलेले होते, त्यांनी जाळपोळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी या मास्क घातलेल्या आंदोलकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

    गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या आदेशानुसार सरकारी अधिकारी देशात अवैधरित्या राहणाऱ्या लोकांची ओळख पटविण्याचे आणि त्यांना देशाबाहेर काढण्याचे काम करत आहे. देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगून या लोकांवर कारवाई केली जात आहे. तसेच काही यातील काही लोक हे सरकारविरोधात होणाऱ्या आंदोलनातही सहभागी होत असतात.

    लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या आंदोलनातील अनेक आंदोलक हे मास्क घातलेले होते. त्यामुळे पोलिसांना त्यांची ओळख पटवणे कठीण जात होते, त्यामुळे आता ट्रम्प सरकारने मास्क घातलेल्या लोकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला जात आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी कायदेशील पद्धतीने देशात राहणाऱ्या लोकांनाही त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे.

    डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमधील आंदोलकाना गंभीर इशारा दिला आहे. निदर्शक जर पोलिस अधिकारी किंवा सैनिकांवर थुंकले तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असं ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले की, ‘लॉस एंजेलिसवर बेकायदेशीर परदेशी नागरिकांनी आणि गुन्हेगारांनी आक्रमण केले आहे. हिंसक जमाव आमच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करत आहेत आणि आमची हद्दपार करण्याची मोहिम थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.’

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!

    May 11, 2026

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif